Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बाईऽऽ बाईऽऽ बाईऽऽ शिवाजीनगर पोलीसांना भलतीच घाई, जुगार अड्डयासोबत आता क्लबचीही घाई,

21 वेळा नियंत्रण कक्षाला जुगार अड्डयाची खबर, पण एकदाही कारवाई न्हाई
पुणे शहर पोलीस गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय….

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
कोरोना महामारी आणि लॉकडाऊन नंतर, संपूर्ण पुणे शहरात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. नोकऱ्या मिळत नाहीत. स्वयंरोजगार सुरू करायचा तर बँका पायरीवर देखील उभे करीत नाहीत. अशा वेळी कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी कुठे भाजीपाल्याची हातगाडी, कुठे चहा वडपावाची हातगाडी, कुठे नाष्ट्याची हातगाडी किंवा झालेच तर चायनिजची हातगाडी टाकुन धंदा करायचा म्हटला तरी भांडलासाठी सुमारे 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. अशा वेळी भांडवल जमा करून धंदा सुरू केला तर प्रथम पुणे महापालिका आणि नंतर स्थानिक पोलीस स्टेशनचे गैरमहसुली अंमलदार हप्ता वसुलीसाठी तत्काळ हजर असतात. आत्ता सुरू केली आहे, हप्ता कुठून देणार, मग कारवाईचे सत्र सुरू होते. ही अवस्था आज प्रत्येक काम करणाऱ्या पुणेकराची झाली आहे. मग काय … पुढे काही मार्गच राहत नाही. ताणतणाव वाढतो मग काय, मित्राबरोबर गुटखा खायची मध्येच दारू प्यायला सुरूवात होते. हळुच मटका जुगार अड्डयाकडे पाय वळु लागतात. मटक्यात कधी सुट्टा, कधी पत्ता, कधी जोड असे खेळण्याचे प्रकार सुरू होतात. कधी लागतो, बऱ्याचदा हारतो. परंतु मटक्याचा नाद लागला की लागलाच म्हणून समजा. मेहेरबान स्थानिक पोलीसांच्या आशिर्वादाने चहा वडपावाची हातगाडी लागत नाही, परंतु बेकायदेशिर कृत्य म्हणून आयपीसी व सीआरपीसी मध्ये गुन्हा असलेले मटका व जुगार अड्डे बिनदिक्कत सुरू राहतात.

बाईऽऽ बाईऽऽ बाईऽऽ शिवाजीनगर पोलीसांना भलतीच घाई, जुगार अड्डयासोबत आता क्लबचीही घाई, –
पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 चे उपआयुक्त श्री. संदीपसिंग गिल यांच्या कार्यक्षेत्रातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत पुणे महापालिकेच्या दळवी हॉस्पीटल येथे मागील दोन महिन्यांपूर्वी मटका जुगार अड्डा सुरू झाला. याबाबत मागील दोन महिन्यात 21 वेळा पोलीस नियंत्रण कक्षाला कळवुन देखील एकदाही कारवाई झाली नाही. आता तर या गुन्हेगार असलेल्या इसमाने क्लब सुरू केला आहे. दिवसातील 18 तास हा जुगाराचा क्लब सुरू असतो. वडपाव, चायनिज, पालेभाजीची हातगाडी लावली तर ते बेकायदेशिर कृत्य आणि मटका, जुगार अड्डे, तीन पत्ती वा अंदर बाहर सारखे लाखो रुपयांची बोली लागणारे धंदे मात्र पोलीसांनी कायदेशिर करून ठेवले आहेत की अशी शंका येत आहे.

भारतीय दंडविधान संहिता व फौजदारी कायदयाने अशा प्रकारच्या जुगाराला बंदी आहे, परंतु स्थानिक पोलीसांनी मनांत आणल तर काय शक्य नाही. कायदयालाच बगल देऊन हद्दीत बेकायेशिर अवैध धंदे सुरू ठेवले जातात. पोलीस नियंत्रण कक्ष केवळ मॅसेज पास करणारी यंत्रणा आहे, परंतु प्रत्यक्षात कारवाई मात्र स्थानिक पोलीस करतात हा नियम आहे. परंतु स्थानिक पोलीसच कारवाई करीत नसतील तर वरीष्ठांनी हस्तक्षेप करणे आवश्यक ठरते. 

दरम्यान बेरोजगारीतून आज नवीन गुन्हेगारी वाढत चालली आहे. आज 21 ऑगस्ट 2023 रोजी पर्यंत पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी आजपर्यंत मकोका व एमपीडीए चे प्रत्येकी अर्धशतक गाठले आहे. एवढी भयानक गुन्हेगारी वाढली आहे. सुमारे 15 ते 25 वयोगटातील तरूणांना हाताशी धरून क्राईम केले जात आहे. परंतु त्या मागे माईंड कोण आहे, त्यामागे मात्र पोलीस लागत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. ही बातमी करीत असतांना,  मंगला टॉकिज जवळ हत्या करणाऱ्या 17 आरोपींना घेवून पोलीस व्हॅन न्यायालयाच्या दिशेन चालल्या होत्या. पुढे मागे पोलीसांची वाहने आणि मध्ये हे 17 गुन्हेगार आरोपी ऐटीत बसले होते. पोलीस सायरनचा आवाज देत सुसाट चालल्या होत्या. जसे काय एखादी राजप्रतिष्ठीत आसामी चालली आहे असा भास होत होता. केवढा हा बडेजाव... 

पोलीस आयुक्त रितेश कुमारांचे निवदेनाविरूद्ध स्थानिक पोलीस स्टेशनचा गैरकारभार –
पोलीस आयुक्त स्वतःच मान्य करतात की, संबंधित गुन्हेगाराने अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी इतर फायदा मिळविण्यासाठी, टोळीचे वर्चस्वासाठी व दहशत कायम ठेवण्यासाठी सातत्याने गुन्हेगार गुन्हे करीत आहेत तसेच पोलीस आयुत श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहराचा पदभार स्वीकारल्यापासून, पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणांवर बारकाईने लक्ष देवून शरीराविरूद्ध व मालमत्तेविरूद्ध गुन्हे करणारे व नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत असेही ते नमूद करतात. परंतु शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत एका कुख्यात गुन्हेगाराने दुसऱ्या कुख्यात गुन्हेगाराकरवी अवैध व बेकायदेशिर धंदा सुरू केल्याची तक्रार केलेली असतांना देखील त्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे त्याच्या गैरधंदयावर काम करणारी मुलांसह आज हीच बेरोजगार मुले पुढे जावुन गुन्हेगार होत आहेत. त्यामुळे मुळ गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करून शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मटका जुगार अड्डे बंद करण्याची मागणी आहे.