Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

10 कोटींचा मुद्देमाल, 682 आरोपींसह 51 ठिकाणी धाडी टाकणाऱ्या राजेश पुराणिक यांच्या विरूद्ध बदनामीचे षडयंत्र

national forum news

पुणे पोलीसांच्या बदनामीची काळी खिचडी कुणी आणि कुठे शिजली…
अंमली पदार्थ-जुगार अड्डे-वेश्याव्यवसाय करणाऱ्यांना थर्ड डिग्रीचा वापर योग्यच…
वेश्याव्यवसाय-जुगार अड्डे चालविणाऱ्यांना 360 डिग्री दयायलाच हवी, नाहीतर, काय..
मग…. पोलीसांनी ह्या गुन्हेगार वळुंना कडेवर घेवून मिरवायचे आहे काय…?

पुणे/दि/ नॅशनल फोरम/प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांच्या कारवाईला ब्रेक लावण्यासाठी त्यांच्या बदनामीचे कटकारस्थान शिजविण्यात आले असून, पुणे पोलीसातील दुसऱ्या धाडसी अधिकाऱ्याचा बळी घेण्याचा प्रकार समोर आला आहे. जुगार अड्डा, वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या गुन्हेगारांकडून पोलीस माहिती घेत असतांना तथापी माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व मेडीकलला पाठवित असतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलीस तिर्थप्रसाद देत असतानाच, कुणीतरी हा जुना व्हिडीओ काढुन तो आत्ता प्रसारित केला आहे. राजेश पुराणिक यांच्या बदनामीची काळी खिजडी शिजवुन 32 हद्दी मोकळ्या करण्याचा हा प्रकार झाला असल्याने काळी खिचडी शिजविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पुणे पोलीसांची बदनामी करणाऱ्या यंत्रणेला वेळीच लगाम घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.


पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अधिनस्था सुमारे 32 पोलीस स्टेशन आहेत तसेच गुन्हे युनिट 1 ते 6, खंडणी विरोधी पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक, सायबर क्राईम या सारखे 15/20 गुन्हे शाखेच्या युनिट आहेत. यामध्ये पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे 250 अधिकारी असतांना देखील ते हद्दीतील अवैध धंदे व समाजविघातक कृत्यांना पायबंद घालण्यात कुठेतरी कमी पडले असल्याचे दिसून येत आहे.
यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी पोलीस बैठकीत, पुण्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीसांना काही सुचना करण्यात आल्या होत्या. यामध्ये ज्या पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व बेकायदेशिर धंदे आढळुन येतील त्या पोलीस स्टेशनच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा व अवैध धंदे करणाऱ्यांना तडीपार करण्याचा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान सुमारे पाच सहा महिन्यापूर्वी सामाजिक सुरक्षा विभागाचा पदभार श्री. राजेश पुराणिक यांनी स्वीकारल्यानंतर, कारवाईचा धडाका उडवुन दिला आहे.


सामाजिक सुरक्षा विभागाची धाडसी कारवाई –
जानेवारी ते ऑगस्ट 2022 या सात आठ महिन्यातील कारवाईचा आलेख पाहिला असता, पुणे शहरातील 250 पेक्षा अधिक अधिकारी काय करीत होते असा प्रश्न निर्माण होईल.
सामाजिक सुरक्षा विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर, श्री. राजेश पुराणिक यांनी 10 कोटी 33 लाख 30 हजार 29 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तर 682 आरोपींवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. तसेच 51 ठिकाणी जबरी धाडी टाकुन धडाकेबाज कारवाई केली आहे.
कुठे किती कारवाया –
1) सामाजिक सुरक्षा विभागाचे श्री. राजेश पुराणिक यांनी मागील सात आठ महिन्यात वेश्याव्यवसाय अर्थात पिटाच्या एकुण 11 ठिकाणी धाडी टाकुन कारवाई करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सुमारे 53 आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 10 लाख 44 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
2) मटका अड्डा, जुगार अड्डे, रमीचे क्लब, ऑनलाईन लॉटरी थोडक्यात ज्या ठिकाणी पैसे लावुन जुगार खेळला जातो त्या 34 ठिकाणी धाडी टाकुन 606 आरोपींना जेरबंद केले आहे तर सुमारे 68 लाख 8 हजार 872 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
3) नशेखोरीचा अव्वल नमुना म्हणजे हुक्का पार्लर. या हुक्का पार्लरवर 2 ठिकाणी कारवाया करण्यात आल्या असून, 10 आरोपींवर कारवाई करून सुमारे 1 लाख 37 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
4) प्रोव्हीबिशनच्या 2 ठिकाणी कारवाया करून 4 आरोपींना अटक केली आहे तसेच 42 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
5) पेट्रोल, डिझेल चोरी प्रकरणी सुमारे 20 डिझेल-पेट्रोल जप्त करून केवळ एका ठिकाणाहून सुमारे 9 कोटी 52 लाख 96 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
6) जे. जे. ॲक्टनुसार एक ठिकाणी कारवाई करून सुमारे 157 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
थोडक्यात 51 ठिकाणी धाडी टाकुन सुमारे 682 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत तर 10 कोटी 33 लाख 30 हजार 29 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ह्या सर्व कारवाईमुळे गुन्हेगारांच्या मनांत पोलीसांविषयी भिती निर्माण झाली आहे. पुणे शहरातून सर्व अवैध धंदे बंद होत आहेत. दरम्यान काही ठिकाणी झिरो पोलीसांमुळे घाबरून व भितीने चोरून धंदे सुरू असले तरी पुणे पोलीस आणि राजेश पुराणिक यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध व बेकादेशिरकृत्य बंद झाले आहेत. गुन्हेगारीवर अंकुश लावण्याचे काम श्री. राजेश पुराणिक यांनी केले आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या पोटात धडकी असली तरी काही पोलीसांच्या पोटात पोटशुळ उठला असल्याचे काही प्रकरणांवरून दिसून येत आहे.

  • पुणे पोलीसांच्या बदनामीची काळी खिचडी शिजवुन 6 हद्दी मोकळ्या करण्याचा प्रयत्न यशस्वी केलात, आता 32 हद्दी मोकळ्या करून टोणग्यांना रान मोकळ करून दयायच का?
  • वेश्याव्यवसाय-जुगार अड्डे चालविणाऱ्या रानगटांना पोलीसी तिर्थप्रसाद दयायलाच हवा, नाहीतर, काय….पोलीसांनी ह्या वळुंना कडेवर घेवून मिरवायचे काय…?
  • अंमली पदार्थ-जुगार अड्डे-वेश्याव्यवसाय करणाऱ्यांना थर्ड डिग्रीचा वापर योग्यच,
  • मानवाधिकारवाल्यांनो, जुगार अड्डे, क्लब, वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थ विक्री करणारे, दुधात भेसळ, खाद्यतेलात भेसळ, पेट्रोल- डिझेल चोरी करणारे, रेशनिंगवर माप मारणारे हे काय तुमचे पाव्हणे आहेत काय..?
    ही तर समाजातील किड आहे, समाजविघातकच आहेत, ही समाजातील किड नाहीशी करायची असेल तर पुणे पोलीसातील राजेश पुराणिकांसारख्या धाडसी अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे रहायचे नाही तर मग काय, असल्या समाजविघातक गुन्हेगारांच्या मागे उभे राहणार आहात काय…?
  • देशात, राज्यात दरदिवशी अनु. जाती, दलित, आदिवासी, परितक्त्या, अल्पवयीन मुलांवर अत्याचार होत असतांना हेच मानवाधिकारवाले कुठल्या बिळात लपुन बसलेले असतात… तेंव्हा का मानवाधिकार पुढे येत नाही…?

राजेश पुरणिक यांच्या बदनामीची काळी खिचडी कुठे शिजली –
एकेकाळी दुरदर्शनी ही भारत सरकारची दृकश्राव्य यंत्रणा कार्यरत होती. ती आजही आहे. परंतु आज जशा वेगवेगळ्या खाजगी वाहिन्या प्रसारित होतात तसे त्या कळात एकमेव दुरदर्शन हेच माध्यम होते. त्या काळात एक शून्य शून्य ही गुन्हे विषयक मालिका कार्यरत होती. त्यात नेहमी असं सांगितलं जायचं की, गुन्हेगारांनी, गुन्हा करतांना कितीही खबरदारी घेतली तरी सुई इतका पुरावा ते मागे ठेवतात. त्यांचे म्हणन आजही खरं आहे. राजेश पुराणिक यांच्या विरूद्ध बदनामी करण्यासाठीचा प्रसारित व्हिडीओ व्हायरल करतांना त्यात ज्यांनी हे कारस्थान केले आहे त्याचे प्रतिबिंब दिसून आले आहे. फक्त कारवाईने पाहिल्यास सगळे दिसून येईल.
वादग्रस्त व्हिडीओ खालील मजकुर ज्या शेलारमामाच्या संगणकीय यंत्रातून बाहेर पडले आहेत. पैकी नदीच्या पलिकडे व नदीच्या वरच्या भागात साजुक तुप टाकलेली भाकरी आणि हिरवी मिरची आणि लसुन घालुन केलेला झुणका भाकरीचा वास पोलीस आयुक्तालयापर्यंत दरवळला आहे. खडकी बाजारातून विद्यापीठामार्गे थेट एनडीए गेट पर्यंत चमच्याने खाल्लेल्या बिर्याणीचा वास हातालाही येत होता. आता वांग्याच भरित मात्र मी विसरून चालणार नाही.
दोन अडीज वर्षापूर्वी एका आयपीएस अधिकाऱ्याविरूद्ध अशीच बदनामीची राळ उठवुन सहा हद्दी मोकळ्या करून घेतल्या होत्या. आता पुराणिकांच्या बदनामीची राळ उठवुन 32 हद्दीतील 64 पट मोकळा करण्याचा घाट घातला आहे. अधिक चर्चा न केलेलीच बरी. परंतु खात्यात असतांना देखील ज्यांनी उदयोग व्यापार केले त्यातील एक दोन आज निलंबित असले तरी ते आजही त्या उदयोग व्यापारात आहेत. त्यांनी अशा प्रकारच्या बदनामीच्या कारस्थानात सहभागी होऊन खात्यात परतण्याचे मार्ग स्वतःच्या हाताने बंद करून घेवू नयेत असा फुकटचा सल्ला दयावासा वाटतो.


तथाकथित मानवाधिकारवाल्यांनो
स्वतःच्या चारचाकी वाहनांवर पोलीस मित्र आणि मानवाधिकार नावाची पाटी लावुन काही मंडळी मानवाधिकार कायदयाचा बाजार मांडत आहेत. काही पोलीस मित्र आणि मानवाधिकार वाल्यांचा कोणता काळा बाजार सुरू आहे हे पोलीसांना थेटच माहिती आहे. बोट क्लब आणि खराडी- मुंढव्यातील मानवाधिकारवाल्यांचे धंदे कसे राजरोस सुरू आहेत हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. न्यूज पोर्टलच्या माध्यमातून राजेश पुराणिक यांच्या व्हायरल व्हिडीओवर सर्वांनी तोंडसुख घेतले आहे. दरम्यान जुगार अड्डे, क्लब, वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थ विक्री करणारे, दुधात भेसळ, खाद्यतेलात भेसळ, पेट्रोल- डिझेल चोरी करणारे, रेशनिंगवर माप मारणारे हे काय मानवाधिकारवाल्यांचे पाव्हणे आहेत काय असा प्रश्न पडत आहे.
अवैध धंदे करणारे, ही तर समाजातील किड आहे, समाजविघातकच आहेत, ही समाजातील किड नाहीशी करायची असेल तर पुणे पोलीसातील राजेश पुराणिकांसारख्या धाडसी अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे रहायचे नाही तर मग काय, असल्या समाजविघातक गुन्हेगारांच्या मागे उभे राहणार आहात काय असाही सवाल नागरीक व्यक्त करीत आहेत.

दरम्यान देशात, राज्यात दरदिवशी अनु. जाती, दलित, आदिवासी, परितक्त्या, अल्पवयीन मुलांवर अत्याचार होत असतांना हेच मानवाधिकारवाले कुठल्या बिळात लपुन बसलेले असतात... तेंव्हा का मानवाधिकार पुढे येत नाही...अशी कमेंट फेसबुकवर वाचकांनी दिली आहे.  त्यामुळे धाडसी अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनीच पुढे येणे काळाजी गरज आहे.