Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेच्या पद्मावती येथील शिवशंकर पोटे दावाखान्यात नगरसेवकांची आरेरावी

कोरोना व्हॅक्सिन कुणाला दयायचे हे नगरसेवक ठरवितात, वैदयकीय अधिकारी अळी-मिळी-गुप-चीळी

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महानगरपालिकेच्या पद्मावती येथील सरकारी दवाखान्यात कोरोनावर व्हॅक्सिन देण्याचे काम केले जात आहे. पहाटे सहा वाजल्यापासून अनेक नागरीक रांगेत उभे असतात. दवाखाना साडेनऊवाजता उघडला जातो. नगरसेवकांचे कारकर्ते ९ वाजता येवून थांबतात. नगरसेवक दहा वाजता येतात. मग त्यानंतर प्रत्येकाला टोकन देण्याचे काम केले जाते. परंतु पहाटेपासून थांबलेल्या नागरीकांना टोकन देण्याऐवजी नगरसेवकांच्या लोकांनाच टोकन देवून व्हॅक्सिन घेण्यासाठी पाठविले जात असल्याने स्थानिक नागरीकांमध्ये प्रचंड आणि कमालिचा असंतोष निर्माण झाला आहे.


याबाबत माहिती अशी की, पुणे महापालिकेच्या शिवशंकर पोटे दवाखान्यात व्हॅक्सिन देण्याचे काम केले जात आहे. नागरीक भल्या पहाटेच येवून नंबर लावत आहेत. अशा वेळी लाईनमध्ये थांबलेल्या नागरीकांना क्रमवारीनुसार नोंद घेवून त्यांना टोकन देवून व्हॅक्सिन घेण्यासाठी पाठविणे आवश्यक ठरते. परंतु पोटे दवाखान्यात नगरसेवक आणि त्यांचे एजंट बनाम कारकर्ते थांबलेले असतात. त्यांच्या जवळच्याच नागरीकांना टोकन दिले जावे यासाठी ते आग्रही असतात. कधी कधी स्थानिक नगरसेवकांमध्ये बाचाबाची देखील होत आहे. प्रत्येक नगरसेवक आपल्याच मतदारांना टोकन देवून त्यांचे व्हॅक्सिन करून घेण्याचा आग्रह धरत आहेत. तथापी जे नागरीक भल्या पहाटेपासून थांबलेले आहेत, त्यांचा कुणीची विचार करतांना दिसत नसल्याचे दिसून आले आहे. दररोज हाच प्रकार घडत असल्यामुळे नागरीकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
दरम्यान शिवंशकर पोटे दवाखान्यातील वैदयकीय कर्मचारी, वैदयकीय अधिकारी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून, नगरसेवक जसे संागतील तसे वागत आहेत. नागरीकांना तक्रार करूनही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे प्रमुख वैदयकीय अधिकारी व उपायुक्त कार्यालयांनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.