Friday, April 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयातील निविदा कामांतील भ्रष्टाचाराची चौकशी करा

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महानगरपालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयातील निविदा कामांतील भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करून सह महापालिका आयुक्त अर्थात क्षेत्रिय अधिकार्‍यांना बडतर्फ करण्याची मागणी विविध संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत माहिती समजते की, बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या प्रभाग क्र. ३६ मधील डॉ. आंबेडकर नगर व प्रेमनगर या मार्केटयार्ड येथील वसाहतींमध्ये वेगवेगळी निविदा कामे काढण्यात आली आहे. यामध्ये सुलभ शौचालय दुरूस्ती, वसाहतीत सिमेंट कॉंक्रीट करणे, डे्रनेज लाईन दुरूस्ती आदी कामांचा समावेश आहे.

मार्केटयार्ड आंबेडकरनगर येथे तर अस्तित्वात नसलेल्या शौचालयाची दुरूस्ती केल्याचे दाखविण्यात आले आहे. मार्केटयार्ड आंबेडकरनगर येथे एकुण चार सुलभ शौचालये आहेत. या चारही सुलभ शौचालयांची दुरूस्ती करण्यात आली असल्याचे निविदेतील कागदपत्रे, एमबी व फोटोवरून दिसून येत आहे. तथापी निदिा कामासोबत केलेल्या कामाचे फोटो मध्ये दाखविण्यात आलेले कामे ही मुळात तिथली नसल्याचे सांगण्यात आले आहे. जे फोटो जोडण्यात आले आहेत, ते या शौचालयातील नसून इतर ठिकाणचे फोटो जोडण्यात आले आहेत. प्रत्यक्षात जागेवर आहे तीच परिस्थित आहे.
प्रेमनगर मधील गणेश मंदिराजवळ रस्ता कॉंक्रीट काम दाखविण्यात आले आहे, वास्तविक पाहता, प्रेमनगर मध्ये एकुण तीन गणेश मंदिर आहेत. एका गणेश मंदिराजवळ मंडळाच्या वतीने सिमेंट कॉक्रीट केले आहे, दुसर्‍या मंडळाजवळ निव्वळ माती व मुरूम आहे, तर तिसर्‍या गणेश मंदिराजवळ पाच सहा वर्षापूर्वी केलेले सिमेंट कॉंक्रीट आढळुन आले आहे. तसेच ज्या कामांचे फोटो व लोकेशन फोटो मध्ये दिसते, ते प्रेमनगर येथील नसून इतर ठिकाणचे आहे. त्यामुळे न केलेल्या कामांचे बील बचतवाढ मंजुर करून, वसुल केले आहेत.
माहितीचे अधिकारात, निविदा कामांची माहिती घेण्यात आली. रँडम पद्धतीने इथल्या कामांची पाहणी केली असता, वरील परिस्थिती आढळुन आली आहे. त्यामुळे बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाने काढण्यात आलेल्या सर्वच कामांची चौकशी करून दोषी विरूद्ध कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन फेडरेशनचे अध्यक्ष अनिरूद्ध चव्हाण यांनी केली आहे.