Monday, November 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

२०० कोटींचा भ्रष्टाचार- गैरव्यवहार करून, लपण्यासाठी पत्नीचा वापर करणार्‍या रामचंद्र शिंदेंचे पुनर्वसन बांधकाम झोन ३ च्या बाणेर- बालेवाडीत….

१०० वर्षांच्या चिंचेचा जसा आंबटपणा कमी होत नाही, अगदी तस्साच प्रकार जयवंतराव आणि श्रींमतराव यांच्यातून जराही कमी झाल्याचे दिसत नाहीये…


पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभाग क्र. ७ मध्ये सुमारे २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार- गैरव्यवहार करून, ते लपविण्यासाठी माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या अंगावर बांधकाम व्यावसायिकांच्या गुन्हेगारी टोळयांचा आधार घेणे, गुन्हेगारांना अंगावर पाठविणे, तृतीयपंथी इसमांसहित स्वतःच्या पत्नीचाही वापर करून, कार्यकर्त्यांवर जबरी दहशत बसविण्यात आलेल्या रामचंद्र शिंदे यांचे पुनर्वसन बांधकाम विभाग क्र. ३ च्या बाणेर बालेवाडीत करण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे समजले आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या कनिष्ठ अभियंता रामचंद्र शिंदेची बदली अकार्यकारी पदावर बीओटी करून अजून १० दिवसही झाले नाहीत तोपर्यंत त्यांच्या पुनर्वसनाचे काम सुरू केले असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांनी रामचंद्र शिंदे याच्या बदलीचे आदेश १७ नोव्हेंबर रोजी काढण्यात आले आहेत. तसेच रामचंद्र शिंदे यांची अकार्यकारी पदाचे काम देण्यात यावे, बदलीच्या आज्ञापत्रकानुसार तातडीने पद सोडण्यात यावे, बदली आदेशाव्यतिरिक्त प्रत्यक्ष कामकाजाच्या खात्यामध्ये बदल केल्यास संबधित सेवक व खातेप्रमुख यांचे विरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल तसेच बदली आज्ञापत्रकाच्या दिनांकापासून त्यांचे वेतन बदलीने नियुक्त केलेल्या खात्यात अदा करण्यात येईल असेही बदली आज्ञापत्रकात आदेशित करण्यात आले आहे. असे असतांना देखील रामचंद्र शिंदे यांनी बदली खात्यात दोन दिवस मुक्काम करून चौथ्या दिवशी पद रिक्त करण्यात करून अतिरिक्त आयुक्तांचा अवमान केला आहे. अशा कुप्रवृत्तीच्या कनिष्ठ अभियंत्यांला पगाराला बीओटी खात्यात तर प्रत्यक्ष कामाला बाणेर बालेवाडीत घेण्याचे कारस्थान का रचले जात आहे या मागचे इंगित समजत नाहीये.

बांधकाम विभागातील राम – लख्खन जोडी –
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात उपअभियंता जे.बी. पवार आणि कार्यकारी अभियंता श्रीमंत वायदंडे यांची जोडी राम – लख्खन सारखी असल्याचे खात्यात बोलले जाते. जिथं राम तिथं लख्खन हे ठरलेलं आहे. दोनही कर्मचारी सातत्याने बांधकाम विभागात वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. बांधकाम व्यतिरिक्त इतर खात्यात बदली झाली तरी पगाराला तिकडं आणि कामाला प्रत्यक्षात बांधकाम विभागात असल्याचे सर्व पुणेकरांनी पाहिले आहे. बांधकाम विभाग हा राम- लख्खन यांना आंदण दिल्यासारखाच आहे. विभाग प्रमुख आणि खातेप्रमुखही याबाबत काहीच बोलत नाहीत त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई तर दूरच…. आता यांच्या जोडीला रामचंद्र शिंदेला आणण्याचा घाट घातला असल्याचे समजत आहे.

ज्याने नुकसान केले त्याला बाणेर – बालेवाडीत आणण्याचे कारणच काय –
रामचंद्र शिंदे यांनी पुणे महापालिकेचे सुमारे २०० कोटी रुपयांपेक्षाही मोठे आर्थिक नुकसान केल आहे. अवैध बांधकामांना पाठीशी घालुन कोट्यवधी रुपयांचा डेव्हेलपमेंट चार्जेच बुडविण्यात कसुरदारांना मदत केली आहे. अशा इसमाला बाणेर बालेवाडीत आणण्याचे कारण काय समजु शकत नाहीये. अतिरिक्त आयुक्तांनी अकार्यकारी पदाचे काम देण्याचे सांगितले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर शिंदे यांना आणण्याचे प्रयोजन न समजण्या पलिकडचे आहे.
दरम्यान बाणेरचे कनिष्ठ अभियंता यांना काल दुरध्वनी केला होता. परंतु बिल्डींग ते सावरकर भवन पर्यंत ट्रॉफिक जाम व पावसामुळे भेट होवू शकली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात काय चालले आहे समजण्यास आले नाही. मराठीत एक म्हण आहे, १०० वर्षांच्या चिंचेच्या झाडाचा आंबटपणा जसा कमी होत नाही, अगदी तस्साच प्रकार इथ पहावयास मिळत आहे. जयंतराव आणि श्रीमंतराव यांच्यातील आंबटपणा जराही कमी झाल्याचे आजतरी दिसत नाहीये.