Friday, December 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा – बाळासाहेब आंबेडकर

मुंबई/दि/प्रतिनिधी/
आरएसएस भाजपावाले विरोधकांना ऐनकेनप्रकारे घाबरवतात. देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रातील तत्कालिन सरकारने आणि केंद्रातील सरकारने मलाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याकथित खूनाच्या कटात अडकाविण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यात काहीच त्यांना मिळाले नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करून दाखवा असं आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींना केलं आहे.

बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात नागरिकत्व सुधारणा कायदयाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बाळासाहेब आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कॉंग्रेसवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
भाजपा, आरएसएस देशात अराजकता माजवित आहे. हा कायदा ४० टक्के हिंदूंच्या विरोधात आहे. कूंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने इथल्या भटक्या, आदिवासी, कुणबी तसेच अर्थव्यवस्थेविरूद्ध डफडी वाजवली असती तर आम्हालाही वेगळी डफडी वाजवायला लागली नसते. अशी टिका बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे.
दरम्यान ज्याच्याकडे जमिन त्याच्याकडे कागदपत्र, जमीन नाही त्याच्याकडे कागदपत्रे नाहीत, बाप कुठे मेला, पंजोबा कुठे मेला हे ज्या समूहाला माहित नाही, त्याला कागदपत्रे कसली मागता… असा सवाल बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे.