Friday, November 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शेअर रिक्षामध्ये पॅसेंजर म्हणून बसवून लुट करणार्‍या टोळक्यास सहकारनगर पोलीसांनी केली अटक

पुणे/दि/ प्रतिनिधी/
सराईत गुन्हेगारांनी गुन्ह्याची पद्धत बदलली, तसतशी पुणे शहर पोलीसांनी देखील आपल्या पारंपारीक पद्धतीसह गुन्हयाची उकल करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. शेअर रिक्षामध्ये पॅसंजर बसवुन मागाहून अंधाराचा फायदा घेवून त्यांना लुटणारी टोळी पुण्यात कार्यरत होती. परंतु पुणे शहर पोलीसांनी समक्षमपणे अशा प्रकारच्या गुन्हेगारांचा छडा लावुन त्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत तर भर दुपारीच शेअर रिक्षा मध्ये पॅसेंजर बसवुन मागाहून प्रचंड रहदारीच्या ठिकाणी पॅसेंजर लुटण्याचा प्रकार समोर आला आहे.


गुन्ह्याची हकीकत अशी की, सेलवम पिल्ले वय ४८ रा दत्तनगर हे गृहस्थ २ जुलै रोजी मार्केटयार्ड येथून शेअर रिक्षाने बालाजीनगर येथील अहिल्यादेवी चौक येथे जाण्यासाठी रिक्षात बसले. परंतु रिक्षा चालक व त्याच्या तीन साथीदारांनी पिल्ले यांना धक्काबुक्की करून त्यांच्या गळायातील सोन्याची चैन काढुन घेतली. भर दुपारी हा प्रकार घडला होता. यानुसार सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंदही झाली.
दरम्यान सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती देसाई व गुन्हे विषयक कामकाजाचे पोलीस निरीक्षक श्री. युनूस मुलानी यांच्या अधिपत्याखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक श्री. सुधीर घाटगे व तपास पथकातील पोलीस अंमलदार सागर शिंदे व संदीप ननवरे गुन्ह्याची उकल करीत होते. अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत असतांना, पारंपारीक गुन्हा तपासाचा वेग देण्यात आला. दरम्यान गुन्ह्याचा तपास करीत असतांना शिंदे व घाटगे यांना बातमीदारामार्फत समजले की, वरील गुन्ह्यात वापरण्यात आलेली रिक्षा व त्यातील इसम हे शिवनेरी नगर कोंढवा येथे असल्याचे समजले. तत्काळ पोलीस बंदोबस्तासह खाजगी वाहनाने पोलीस कोंढवा येथे पोहोचले.
श्री. पिल्ले यांनी वर्णन केलेल इसम आढळुन आले. संबंधितांना सापळा रचुन अटक करण्यात आली. त्यांचे नाव पत्ता विचारला असता, त्यातील १. वशिम अजमल खान रा. कोंढवा मुळ गाव – नसिराबाद जळगाव २. मोसिन खान नुर खान पठाण रा. जळगाव ३. अन्सार खान रा. कोंढवा ४. अब्दुल बार्शिकर रा. लोणी काळभोर असल्याचे समजले. अधिक चौकशी करता त्या चौघांनी मिळून रिक्षाचा वापर करून दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली. संबंधित गुन्हेगार हे सराईत असून त्यांी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता असल्याने त्यांचा अधिक तपास सुरू आहे. वरील नमूद गुुन्हेगारांकडून सोन्याच्या मालासह ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
सहकारनगर पोलीसांनी अतिशय शिताफीने गुन्ह्याचा तपास केला असून यामध्ये सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाटगे, पोलीस हवालदार बापु खुटवड, पोलीस नाईक प्रकाश मरगजे, संदीप ननवरे, सतिष चव्हाण, भुजंग इंगळे, सागर शिंदे, महेश मंडलिक, प्रदीप बेडीस्कर यांनी गुन्हेगारांचा तपास करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.