Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्याच्या दख्खन प्रांतात किरकोळ अतिक्रमणांचा डोंगरा एवढा विळखा,वारंवार कारवाई करून महापालिका थकली, पण व्यापारी मात्र निगरगट्ट

सुधिर कदमांकडून नियोजनबद्ध – कालबद्ध अतिक्रमण काढण्याचा कार्यक्रम

पुणे/दि/
पुणे शहराच्या दख्खन प्रांतातील कोथरूड, कर्वेनगर, एरंडवणा, जे.एम. रोड, एफ.सी रोड, न. ता. वाडी हा अतिउच्चभू्र परिसर म्हणून ओळखला जातो. अतिसुशिक्षित असल्यामुळे कायदयाचं प्रचंड ज्ञान. यामुळे छोट्या मोठया करणांसाठी थेट कोर्टात धाव घेवून, प्रकरण अधिकृत असो की अनाधिकृत असो, थेटच सर्व प्रकरणांवर स्टे घेण्याची इथली परंपरा आहे. दुकाने भाड्याने देणे आणि दुकानाच्या बाहेर दहा पंधरा फुटापर्यंत शेड थाटणे, घरे फ्लॅट भाड्याने देणे आणि तितकेच अतिक्रमण करणे हा या भागातील सर्वात मोठा छंद आहे. पुणे महापालिकेच्या
बांधकाम विकास विभाग क्र. ६ कडून वारंवार कारवाई करून देखील पुन्हा अतिक्रमणांचा
विळखा उभा केला जात आहे. कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केट आणि कांबळे गार्डनवरील फॅशन स्ट्रीटला लागलेल्या आगीवरून आता काहीतरी बोध घेणे आवश्यक ठरले आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीत अनाधिकृत बांधकामे करण्याचा सपाटा सुरू आहे. ठराविक कालावधी नंतर पुणे महापालिकेकडून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६ यांच्या हद्दीत अनाधिकृत बांधकामांची (निवासी आणि व्यापारी) संख्या नगण्य असली तरी, अधिकृत बांधकाम असलेल्या दुकान, घरे, फ्लॅटच्या समोर व बाजूला तात्पुरते छत निर्माण करून पुण्याच्या दख्खन प्रांतातील जे.एम., एफ.सी, रोड, न. ता. वाडी रोड एरंडवणा, कर्वेनगर कोथरूड परिसरात अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. 
पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६ यांनी शिवाजीनगर येथील जे. एम. रोड, एफ.सी रोड, न.ता वाडी रोड, एरंडवणा, कर्वेनगर या ठिकाणी वारंवार कारवाया केल्या असल्याचे अतिक्रमण कारवाई वरून दिसून येत आहे. अनाधिकृत बांधकाम केले प्रकरणी सुमारे ४०० जणांना नोटीसा देण्यात आलेल्या आहेत, तसेच तितक्याच मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आलेल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान आज अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली की, लगेच दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी पुन्हा नव्याने आहे त्याच जागेवर शेड व तात्पुरते छत उभे केले जात आहे. 

सुधीर कदमांकडून नियोजनबद्ध कारवाईचे सुत्र –


बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६ चे कार्यकारी अभियंता श्री. सुधीर कदम यांच्याकडून, जे.एम., एफ.सी, रोड, न. ता. वाडी रोड एरंडवणा, कर्वेनगर कोथरूड परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणांविरूद्ध नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. तथापी अनेक वर्षांपासून काही व्यापारी व भाड्याने जागा दिलेले इसम हे पुणे महापालिका कोर्ट व जिल्हा न्यायालयात गेले असून, त्यांनी काही प्रकरणांवर स्टे ऑर्डर आणली आहे. तथापी विहीत वेळेत कोर्टात सद्यःस्थितीचा अहवाल सादर करून, स्टे उठविण्याचे काम सुरू आहे. तसेच काही प्रकरणांवर सुनिल परशुराम भुजबळ विरूद्ध स्टैट ऑफ महाराष्ट्र या २०१५ च्या निकालाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तातडीने कारवाई करण्यात येत आहे. तसेच याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आलेला असल्याचे समजते.
पुण्याच्या कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केट व फॅशन स्ट्रीट या व्यापारी पेठांमध्ये आगी लागुन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जे. एम. रोडवर छोट्या मोठ्या बाजार पेठा उभ्या राहिल्या आहेत. सर्वत्र मोठ्या संख्येने अतिक्रमण वाढत आहे. अशा परिस्थितीत कालबद्ध कार्यक्रमाव्दारे वेळीच अतिक्रमण हटविणे आवश्यक ठरले आहे. दरम्यान बांधकाम विकास विभागातील लोकसेवक शरद खारगे यांनी झोन क्र. ७ मध्ये असतांना ज्या प्रकारचे दिवे लावले होते, ते दिवे इथे लावले नाहीत म्हणजे मिळविले. मधुकर येनकर, दत्ता टकले, रामदास पवार, सारणे आदि प्रभूतींनी विहीत वेळेत कोर्ट प्रकरणे निकाली काढण्यासाठी उत्तरे तयार ठेवणेही आवश्यक असल्याचे काहींनी मत व्यक्त केले आहे.