Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेच्या विधी अधिकारी, ऍड. निशा चव्हाण यांचा बर्थ डे महापालिकेत धुमधडाक्यात साजरा

कोरानाचे नियम पायदळी तुडविले- कोरोनाची एैशी की तैशी-

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेच्या विधी विभागातील, मुख्य विधी अधिकारी ऍड. निशा चव्हाण यांचा वाढदिवस मागील आठवड्यात धुमधडाक्यात साजरा करण्यात आलेला आहे. पुणे महापालिकेच्या विधी विभागात तर दिवाळी – दसर्‍यासारखा आनंद ओसंडून वाहत असल्याचे अनेकांनी महापालिकेच्या दुसर्‍या मजल्यावर पाहिले आहे. याच दुसर्‍या मजल्यावर पुणे महापालिकेच्या दोन्ही अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांची कार्यालये आहेत. असे असतांना देखील विधी विभागात जल्लोष करण्यात येत होता. त्यामुळे सगळीकडे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.


पुणे महापालिकेतील काही विशिष्ठ अधिकार्‍यांनी हार, फुले गुच्छ देवून त्यांचे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर पॅनेलवरील व पॅनेलबाहेरील वकीलांनी देखील या जल्लोषात भाग घेतला आहे. थोडक्यात पुणे महापालिकेने नेमून दिलेली कामे सोडून, बहुतांश लाभार्थी खाते व वकीलांनी हा जल्लोष साजरा करून पुणे महापालिकेचे पावित्र्य नष्ट केले असल्याची भावना अनेक नागरीकांनी व्यक्त केली आहे.
एखाद्या कर्मचार्‍याचा वाढदिवस हा त्याचा वैयक्तिक भाग आहे. कर्मचार्‍यांच्या वाढदिवसाचा आणि पुणे महापालिकेतील कामाचा कुठेही संबंध येत नाही. परंतु लाभार्थी मंडळी हातातील कामे सोडून शुभेच्छा देण्यासाठी हजर होते. पुणे महापालिकेच्या विरूद्ध निकाल लागलेले व बिल्डरांच्या बाजूने निकाल लागलेले काही बिल्डरांकडील महिला कर्मचार्‍यांसह स्वतः बिल्डर मंडळी हजर असल्याचे अनेकांनी महापालिकेच्या दुसर्‍या मजल्यावर पाहिल्याने सगळीकडे आश्यर्च व्यक्त होत आहे.

pmc vidhi vibhag birthday celebration


कोरानाचे नियम पायदळी तुडविले- कोरोनाची एैशी की तैशी-
ऍड. निशा चव्हाण यांचा वाढदिवस आज पुणे महापालिकेत धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या वेळी कोरोना नियमांची एैशी की तैशी करण्यात आली. कुणाच्याही तोंडावर मास्क नव्हता,कोणही सोशल डिस्टनिंग पाळल्याचे दिसत नाही. कोरोनाचे गंभिर संकट असतानाही ऍड. निशा चव्हाण यांच्या कार्यालयात सर्व सेवक व वकीलांनी कोरोना पसररण्यास मदत केल्याचे दिसत आहे.
विधी विभागामध्ये श्रीमती चव्हाण यांच्या मार्फत वारंवार टीडीआर किंग , एजंट, बिल्डर हे वारंवार मटण आणि बिर्याणीच्या पार्ट्या देतांना दिसत असतात. मटणाच्या पार्ट्या झोडण्यात विधी विभाग व श्रीमती चव्हाण या अतिशय अव्वल असल्याचे दिसत आहे. दुपारी १२ ते ४ पर्यंत काम करायचे आणि याच कार्यालयीन वेळेत ऍड. निशा चव्हाण या मटणाच्या पार्ट्या झोडत असतात. आणि दुपारी ४ नंतर लगेच ऍड. चव्हाण या कार्यालय सोडून घरी निघुन जातात.
त्यामुळे महापालिका आयुक्तांचे आदेश पायदळी तुडविण्यात आले असल्याने पुणे महापालिका आयुक्त, आरोग्य मंत्रालय, नगरविकास मंत्रालय नक्की कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.