Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पगारी नोकरदार पुणे महापालिकेचा, चाकरी मात्र बिल्डरची…….

Pune Pmc zon 7

कनिष्ठांच्या कसुरीचा डाग लागतोय वरीष्ठांवरी

धन्य ती पुणे महापालिका, धन्य ते रामचंद्र सोपान शिंदे आणि धन्य धन्य बांधकाम खाते ….

पुणे/दि/ प्रतिनिधी/
एैका एैका गोष्ट पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र ७ ची… बांधकाम विभागातील शुक्रवार पेठ, बुधवार पेठेची… त्यातील काळ्या कर्माची, त्या कर्माच्या पोटी लपून बसलेल्या मर्माची… येशीला अब्रु टांगावी ह्या निच अधमाची … निच अधमाची..
सर्वसामान्य पेठेतला पुणेकर स्वतःच्या पडक्या, मोडकळीस आलेल्या वाड्याची- घराची डागडूजी करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून पुणे महापालिकेत चकरा मारून मारून त्याचे जोडे झिजले परंतु अधिकारी मात्र जागेवरून हलण्याचे नाव घेत नाहीत. परंतु दुसरीकडे ही अभियंता मंडळी बांधकाम व्यावसायिकांसाठी कसे राब राब राबतात अशा प्रकारची उदाहरणे देखील पुणे महापालिकेत कमी नाहीत. थोडक्यात पदाची ताकद पुणे मनपाची, पगारी नोकरदार पुणे महापालिकेचा आणि चाकरी मात्र खाजगी बिल्डरांची अशी अवस्था आज अभियंता आणि अधिकार्‍यांची झाली आहे. बांधकाम खात्यातील अवघ्या १० ते १५ मंडळींनी संपूर्ण शहर अभियंता कार्यालयाची व दोनशे ते अडीचशे अभियंत्याची मानहानी केली आहे. त्यामुळे अशा कुकर्म्याच्या काळ्या पोतीचा सप्ताह आजपासून सुरू केलेला आहे.

विषय प्रवेश व प्रारंभिची माहितीची –
पुणे महापालिकेचा डीपी २००७ ते २०१७ पर्यंत दहा वर्षात मंजुर झाला आहे. परंतु टीपी आणि गावठाण यांच्यातील एफएसआय वरून अनेक तर्क वितर्क सुरू झाल्याने पुणे महापालिकेने मागील १० वर्षात जुन्या पेठांच्या पुणे शहरातील बांधकामांना मंजुरी देणे बंदच केले होते. अशा अवस्थेत माहे २०११ सालात काही बिल्डरांनी जुने वाडे विकत व विकसनाच्या नावाखाली घेवून दुरूस्तीच्या नावाखाली बांधकामे सुरू केली.
२००७ रोजी ज्या मिळकतीवंर रस्त्यासहीत अनेक प्रकारची आरक्षणे पडली आहेत, हे माहिती असतांना देखील जुन्या व नव्या प्रारूप विकास आराखड्याविरूद्ध जावून बांधकाम विकास विभागाच्या क्रमांक सातने बांधकामांना मंजुरी दिली. नियमात बसत नसतांना देखील अनेकांना मंजुरी दिली. त्यातील शुक्रवार पेठेतील एका वादग्रस्त बांधकामाचे प्रकरण पुणे महापालिकेत मागील एक दिड वर्षापासून गाजत आहे.
पुण्यातील टिळकरोडवरील शुक्रवार पेठेतील एका बांधकामांला पुणे महापालिकेने मनमानीपणे बांधकाम परवानगी दिली. परंतु संबंधित बांधकाम व्यावसायिकाने अधिकार्‍यांच्या साथ संगनमताने पुढे जावून मान्य लेआऊट मध्ये नसलेली बांधकामे करून, अनाधिकृत कृत्य केले.
शुक्रवार पेठेतील कुकृृत्ये –

१) प्रारूप विकास आराखडा व मान्य विकास आराखडा माहे २०१७ नुसार रस्ता रूंदी क्षेत्र हेच दर्शनी सामासिक अंतरात समाविष्ठ केले आहे. दर्शनी सामासिक अंतर शून्य आहे.
२) सदर मिळकतीमध्ये मान्य करण्यात आलेले दुकाने, शॉप्स, त्याच वादग्रस्त दर्शनी सामासिक अंतरात बांधकामे करून दुकानांना ऍक्सेस देणेत आला आहे.
३) इमारतीच्या मान्य नकाशा व्यतिरिक्त दर्शविणेत आलेल्या पॅसेजचे क्षेत्र सदनिकेमध्ये समाविष्ठ करून पुणे महापालिकेचा एफ.एस.आय. मर्यादेचे उल्लंघन केले आहे. मान्य नकाशा वरील प्रत्येक मजल्यावर अंतर्गत पॅसेजचे क्षेत्राचा ऑफिसेस व सदनिकेमध्ये समावेश केला आहे.
४) फ्रंट मार्जिनमध्ये पायर्‍या, (स्टेअर केस) रॅम्प घेण्यात आला आहे.
५) पुणे पेठ शुक्रवार वरील इमारतीचा विना भोगवटा वापर सुरू आहे.
वरील प्रकारचा नियमभंग हा नियमान्वित डीपी रूल नुसार होवूच शकत नाही,हे माहिती असल्यामुळेच बांधकाम विभागातील अभियंत्यांनी कितीही तक्रार अर्ज आले तरी कार्यवाही करायची नाही असेच धोरण ठेवले. तसेच याच बिल्डराच्या वेगवेगळ्या बांधकाम प्रस्तावांना मंजुरी देत गेले व बिल्डराने देखील मिळालेल्या बांधकाम परवानगीच्या आधारे व अधिकार्‍यांच्या साथ संगनमताने मान्य लेआऊट व्यतिरिक्त अनाधिकृत बांधकामे करीत सुटला आहे. विक्रम अगरवाल व मनिष अगरवाल अशी त्या बिल्डर व आर्किटेक्टची नावे आहेत. सोबतच रामचंद्र सोपान शिंदे या अभियंत्यासह काही नगरसेवक मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचे समजले आहे.
डिसेंबर २०१८ पासून या वादग्रस्त बांधकामाबाबत तक्रार अर्ज सुरू असले तरी २०११ ते २०१९ या कालावधीपर्यंत बांधकाम विभागाने, संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या असुरी कृत्यांना पायबंद घालण्याचा कधीच प्रयत्न केला नसल्याचे दिसून आले आहे.
एका रात्रीत झाला खेळ – पुणे मनपात रंगला= रात्रीस खेळ चाले –
पुणे महापालिका आयुक्त कार्यालय, शहर अभियंता कार्यालय, कार्यकारी अभियंता कार्यालय व पुढे नगरविकास मंत्रालय, विभागीय आयुक्त व पुढे आपले सरकार व सरतेशेवटी पुणे महापालिकेच्या ऑनलाईन विभागात या तक्रारींची नोंदणी केल्यानंतर एका रात्रीत बांधकाम खाते झोपेतून जागे झाले. त्यांनी रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र या संघटनेच्या तक्रार अर्जावर शुक्रवार पेठेतील बेकायदा बांधकामाला व बेकायदा कृत्याविरूद्ध ५३ (१) नुसार नोटीस बजाविण्यात आली. जबाबदार अधिकार्‍यांनी ऑनलाईन अभिप्रयात नमूद केले आहे ते खालील प्रमाणे –
रामचंद्र सोपान शिंदे- कनिष्ठ अभियंता, पुणे पेठ शुक्रवार घरांक १.४१ या मिळकतीचे जागा मालक/ विकसक व ला. अर्कि .यांस महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ (१) अन्वये ची सूचना जा.क्र.७/३३१० दि.०८.११.२०१९ अन्वये दिलेली आहे.
उपरोक्त मिळकतीतील मान्य नकाशाव्यतिरिक्त केलेले बांधकाम तडजोड फी आकारून नियमान्वीत करणेकामी आ.एस के डब्ल्यु/००१८/११ दि.०७.११.२०१९ रोजीने प्रस्ताव दाखल केला आहे. वर नमूद बाबी आपले तक्रारीच्या अनुषंगाने कळवित आहोत. असा अभिप्राय देण्यात आलेला आहे.
वास्तविक पाहता, रस्ता रूंदीत २१ फुुट बेकायदा बांधकाम, फ्रंट मार्जिनमध्ये रॅम्प, विना भोगवटा मागील ८ वर्षांपासून वापर, एफ.एस.आयचे उल्लंघन पॅसेजचे क्षेत्र सदनिकेत समाविष्ठ केले… अशा प्रकारचे जबरी गुन्हे असतांना देखील सदरील बांधकाम नियमान्वित होणार आहे काय… डीसी रूल नुसार होणारच नाही… मग एवढा अट्टाहास कशासाठी… बिल्डरांनी कोर्टात जावे… स्टे मिळावा म्हणून पुणे मनपाची यंत्रणा कशी काम करतेय त्याचा अव्वल नमूना पहा.
हा सर्व प्रताप बांधकाम विकास विभागातील रामचंद्र सोपान शिंदे यांनी केला आहे. तब्बल आठ वर्षानंतर प्रथमच बेकायदा बांधकामाची नोटीस देण्यात आली. प्रशांत आगरवाल, विक्रम अगरवाल व मनिष अगरवाल यांनी बरोबर दि. ७/११/२०१९ रोजी बेकायदा बांधकामे नियमान्वित करण्यासाठी प्रस्ताव दिला व ८/११/२०१९ रोजी ५३ ची नोटीस दिली जाते. थोडक्यात एका रात्रीत हा खेळ झाला म्हणावा नाहीतर तर काय…. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, न्यायालय देखील गोमातेच्या शेणात चमड्याचा जोडा बुडवून अशा बथ्थड अभियंत्याच्या थोबाडीत लगावेल की नाही हे आता तुम्हीच सांगा… अहो हे पुणे शहर आहे… मुक्काम पोस्ट ठकवाडी.. नगरपरीषद ठकवाडी नव्हे…
रामचंद्र सोपान म्हणजे, नव्हती अब्रु, नव्हती चाड- गुरूपरीस चेला व्दाड-
बांधकाम विभागाच्या बुधवार पेठ, शुकवार पेठेचा कारभार सध्या रामचंद्र सोपान याच्याकडे आहे. बुधवार व शुक्रवार पेठ म्हणजे पुणे शहराचा ऑक्सीजन आहे. त्या ऑक्सिजन वर घाला घालण्याचे निच व अधम कृत्य रामचंद्र सोपान याने केले आहे. मनिष अगरवाल व विक्रम अगरवालाने पुणे शहराला गंडा घालून थैल्या गोळा केल्या असतीलही म्हणून काय त्याच्या दरबारात पुणे महापालिकेची अबु्र विकण्याचा ठेका ह्या शिंदेला दिला कुणी…. ह्याच कार्यालयातील दिपक मांजरेकर, देवेंद्र पात्रे सारखी वर्ग एकची मंडळी शिंदेच्या दहशतीखाली वावरत आहेत ही बाब कुणाच्या लक्षातच आली नाही…
रामचंद्र सोपान शिंदे आणि ऍट्रॉसिटीची धमकी
प्रशांत आगरवाल व विक्रम अगरवाल तसेच ला. आर्कि. मनिष अगरवालच्या १० ते १२ साईटस बुधवार, कसबा व शुक्रवार पेठेत सुरू आहेत. बहुतांश प्रकरणांत मान्य लेआऊट व्यतिरिक्त बांधकामे केली आहेत. प्रत्येक प्रकरणात डीपी व डीसी रुलची तोडमोड केली आहे. ती यापुढील काळात आपण पाहणारच आहोत. परंतु अगरवालच्या फडात नाची म्हणा किंवा नाच्या म्हणून रामचंद्र शिंदेने स्वतःच वेगळ अस्तित्व निर्माण केलं आहे. पुणे महापालिकेच्या खुर्चीवर बसून माहिती अधिकार कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, बातमीदारांनी माहिती मागितल्यास त्याला ऍक्ट्रॉसिटीची धमकी दिली जात असल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
खरं तर पदोन्नतीला अपात्र असतांना देखील पुणे महापालिकेेने पात्र ठरवून थोडक्यात देवता समजुन शिंदे सारख्यांना पुणे मनपाने चंदनाच्या देव्हार्‍यात बसवलं पण अगरवाल सारख्या बिल्डरांच्या चवली पावलीवर उड्या मारण्यात त्यानं धन्यता मानली आहे.