Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना नोकर्‍याच मिळू शकणार नाहीत!

Unemployment

पुणे/दि/प्रतिनिधी/
२०३० साली जवळपास निम्म्याहून अधिक दक्षिण आशियाई विद्यार्थी हे कौशल्याच्या अभावी नोकरी मिळण्यास अपात्र ठरणार असल्याचा धक्कादायक अंदाज युनिसेफ संस्थेने वर्तवला आहे. युनिसेफच्या प्रमुख हेंद्रिटा फोर यांनी ही माहिती दिली आहे. दररोज दक्षिण आशियायी देशांमधून सुमारे १ लाख तरुण हे नोकरी वर्तुळात आशेने प्रवेश करतात.
आधीच जागतिक मंदीमुळे दक्षिण आशियातले देश कठीण कालखंडातून जात आहेत. सध्या या देशातले हजारो तरुण बेरोजगारीला तोंड देत आहेत. त्यातच भविष्यात देशातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य अभावामुळे होणारे नुकसान मोठे असणार आहे.
फोर यांच्या मते,कुशल तरुणांच्या कौशल्याचा परिणाम हा थेट त्या देशाचा आर्थिक विकासावर होतो. भारतात सध्या अशा तरुणांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यातही बेरोजगारीचा अधिक फटका बसू शकतो असा इशाराही यात देण्यात आलेला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी संस्थेच्या मते बेरोजगारीचा दर सध्या ८.४५ टक्के आहे. ऑटो, टेलिकॉम आणि आयटी सारख्या क्षेत्रात हा दर अधिक असल्याचे दिसत आहे.