Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

देवेंद्र फडणवीसांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचा खळबळजनक दावा करणारा गजाआड

पुणे/दि/ प्रतिनिधी/
विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचा दावा करणार्‍या पिंपरी चिंचवड येथील युवराज दाखले या व्यक्तीस वाकड पोलिसांनी अटक केली आहे.


फडणवीस यांनी तृतीयपंथीय व्यक्तीस खोटे आश्वासन देऊन त्याच्याशी समलैंगिक संबंध ठेवले, असा खळबळजनक दावा युवराज दाखले या व्यक्तीने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत केला होता. या व्हिडीओमुळे राज्यात खळबळ उडाली होती. विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना एका तृतीयपंथी व्यक्तीस खोटे आश्वासन देऊन त्याच्याशी समलैंगिक संबंध ठेवले, असा दावा युवराज दाखले या व्यक्तीने पोस्ट केलेल्या व्हिडीओत केला होता.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र राजकीय पडसादही उमटले होते. भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या सदस्या कोमल शिंदे यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरून वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवराज दाखले याला अटक केली आहे.
गुरूवारी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. कोणत्याही राजकीय नेत्याविरुद्ध अशा पद्धतीने बदनामीकारक पोस्ट करणे चुकीचे असून संबंधित व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते.