Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

छुमक छूम नाचे, नाचे… नर्तकी… अन् पब-डान्सबारच्या हिंदोळ्यावर स्वप्निलरावांचे हिंदोळे

sadpoliceman

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/

                आमी इंद्राच्या घरच्या वारांगणा, नाचुनिया खूष करू, सकलजना…चा ठेका धरत… शृंगारातून आले न्हावून, स्वर्गातल्या मेनके सारखी पर्यंत संध्याकाळी ८ वाजल्यापासून ते पहाटे ४ ते पाच वाजेपर्यंत विमानतळ पोलीसांच्या साक्षीने पब, डान्सबार, हुक्का पार्लरवर भल्या मोठ्या पगारदारांची बैठक रंगलेली असते. याच लेटनाईट पार्ट्यांमध्ये मग हळुच हायप्रोफाईल गर्ल्सचा शिरकाव होतो. बैठक आणखी रंगाला येते. याच पब-डान्सबारच्या हिंदोळ्यावर सध्या विमानतळ पोलीस स्टेशनमधील स्वप्निलरावांच्या हिंदोळ्याला बहर आला आहे. विमाननगरातील फर्माइश, ऍटमोसफेर पासून ते दोराबजीच्या गल्लीतील हुक्का पार्लर व इथुन पुढे डझन दोन डझन ठिकाणी बैठकांचे फड रंगात आलेले असतात. त्याचा त्रास आता विमानतळ पोलीस ठाणे हद्दीतील वसाहती, सोसायट्या व झोपडपट्यांना होत आहे. लेट नाईट पार्ट्यां आणि रात्र सुरू असलेला धिंगाणा आता रस्त्यावर आला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या नागरीकांनी तक्रारीचा पाढा वाचायला सुरूवात केली. परंतु विडा रंगलेल्या स्वप्निलरावांच्या हिंदोळ्याला आवर घालणार तरी कोण….

                सदरची हकीकत अशी की, विमाननगर, कल्याणी नगर या जुळ्या भावांच्या उपनगरात सध्या कॉल सेंटर, मॉल्सची संख्या अगणित झाली आहे. लाख लाख रुपये पगार घेणारे आणि कोट्यधीश असलेले बिजनेसमॅन स्वतःच्या विरंगुळ्यासाठी सध्या कोरेगाव पार्कसह कल्याणी नगर व विमाननगरात विसाव्याला येत आहेत. यामुळेच देशी विदेशी पर्यटकांसह, देशी विदेशी हायप्रोफाईल सुंदर्‍यांनी देखील स्वतःच्या धंद्यासाठी विमानतळाला अधिक पसंती दिली आहे. संध्याकाळी सात/ आठ वाजल्यापासून संपूर्ण विताननगरात चारचाकी वाहनांची गर्दी वाढू लागली आहे. गाड्या आजुबाजूला पार्क करून, युवक युवतींचे अश्‍लिन चाळयांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे ह्याला कुठेतरी आवर घालण्याची मागणी होत आहे.

                दरम्यान विमाननगर व विमानतळ पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील लुंकड बिल्डरांच्या बहुतांश बिजनेस इमारतींमधील टेरेसवर अशा प्रकराचे उद्योग मोठ्या ंसंख्येने उभे राहिले आहेत. अगदी ९० टक्के इमारतींच्या टेरेसवर पब, डान्सबारचा धडका सुरू असतो. अंमली पदार्थांची मोठी बाजारपेठ म्हणून कोरेगाव पार्क, खडकी व विश्रांतवाडी पोलीस ठाण्यांचा अव्वल नंबर लागत होता. परंतु सध्या अंमली पदार्थांची विक्री व सेवन करणार्‍यांची संख्या सध्या विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढली आहे. दरम्यान विमानतळ पोलीस ठाणे हद्दीतील  इतरही इमारतींमध्ये ढाणऽऽ ढाणऽऽ पहाटेपर्यंत सुरू असते. त्यातच दिवसभर यमुनानगरासहित इतर झोपडपट्यांमध्ये मटका आणि ऑनलाईन लॉटर्‍यांचा बाजार भरलेला असतोच. ह्याला वाली कोण आहे…. पोलीस आयुक्त हे थांबविणार आहेत की नाहीये… थोडक्यात लावणीच्या भाषेत सांगायचे तर – ही कला कलान् कला वाढली कशी, येड्या खूळ्या संग बी शानंबी पडलं फशीऽऽऽ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

                ज्या पोलीस ठाण्याचा वसूलदार एवढा रंगतरंग आहे, त्या पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक गुन्हे हे किती रंगरंगावलीचे चाहते आहेत हे यावरून दिसून येत आहे. नागरीकांची ओरड आली तरी पोलीसी खाक्या दाखवुन त्याला गप्पगार करणे एवढचे काम सध्या विमानतळ पोलीस ठाणे करीत आहे.

                त्यामुळे कालपर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचा कारभार हाती घेतल्यानंतर जशी धडक कारवाई मुंढवा, कोंढवा, कोरेगाव पार्क येथे केली, तशी कारवाई विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत का होत नाहीये. का… हा देखील पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा जुमला होता….. ऽऽऽ

                दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे विभाजन होण्यापूर्वी सहा सात महिने अगोदर, पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ चार मधील १० पोलीस ठाण्यातील गैरकारभाराची तक्रार मुख्यमंत्री कार्यालयय, गृहमंत्रालय, पोलीस महासंचालकांसहित लोकायुक्तांकडे केलेली आहे.

                 सध्या खडकी पोलीस ठाणे, विमानतळ पोलीस ठाणे, विश्रांतवाडी पोलीस ठाणे,दघी पोलीस ठाणे,येरवडा पोलीस ठाणे, हडपसर पोलीस ठाणे, वानवडी पोलीस ठाणे व मुंढवा पोलीस ठाणे चौकशीच्या रडावर आहेत. परंतु कारवाई शून्य आहे. याबाबत योग्य ते प्रतिज्ञापत्र सादर केलेले असतांना, अर्जदार यांना काही कळविले नाही. याचा अर्थ संबंधित अर्ज स्वतः शासनाचे कार्यालयाने ताब्यात घेवून कार्यवाही सुरू केली असण्याची शक्यता आहे. परंतु ठोस कारवाई होणे आवश्यक आहे.

                दरम्यान सध्या पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पुण्याच्या दक्षिणेकडील खडकी व चंदनगर शांत असले तरी  विश्रांतवाडी आजही अशांत स्वरूपाची आहे. त्यातच विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने वाढ होत आहे. ही अतिशय गंभिर बाब असून याला वेळीच आळा घालण्याचे तसेच संबंधित अधिकार्‍यांवर तातडीने कारवाईचे आदेश होणे आवश्यक आहे. तथापी परिमंडळ चार व पाच कार्यालयातील प्रतिनियुक्तीवरील कर्मचार्‍यांचे ह्याला अभय असल्यास ही अतिशयच गंभिर बाब असू शकते. त्यामुळे कारवाई तातडीने करण्याची मागणी होत आहे.