Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारास सहकारनगर पोलीसांनी केले ४८ तासात जेरबंद

पुणे/दि/ प्रतिनिधी/
अट्टल गुन्हेगार हा नेमका कसा असतो हे सहकारनगर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील धनकवडी येथील घरफोडी प्रकरणांवरून दिसून येते. धनकवडी येथील राजमुद्र सोसायटीत पाच लाख रुपयांची घरफोडी करून, त्याचा कोणताही आणि कसल्याही प्रकारचा पुरावा मागे न ठेवता त्याने घरफोडी केली होती. त्यामुळे घरफोडी ज्या पद्धतीने केली आहे त्याचा मागोवा घेत असतांना, थोडक्यात घरफोडी करतांना चोरट्याने वापरलेल्या मोडसवरून अशा प्रकारचा गुन्हा हा एखादया सरावलेल्या गुन्हेगाराने केलेला असावा असा संशय बळावला. मग सहकार नगर पोलीसांनी, पोलीसी खाक्या पद्धतीने तपास सुरू केला आणि ४८ तासाच्या आतच खरा गुन्हेगार पोलीसांच्या हाती लागला.


गुन्ह्याची खबरबात अशी की, सहकारनगर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील धनकवडीतील राजमुद्रा सोसायटीमध्ये २२ जुन रोजी दुपारच्या वेळी एका अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातील पाच लाख रुपये चोरून तो पसार झाला होता. याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला. दरम्यान दाखल गुन्ह्याचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. युनूस मूलानी यांच्या अधिपत्याखालील तपास पथकाचे अधिकारी श्री. सुधीर घाडगे व अंमलदार करीत होते.
दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये घटनास्थळाची पाहणी करीत असतांना अज्ञात चोरट्याने गुन्हे करण्याच्या मोडसवरून अशा प्रकाचा गुन्हा हा एखादया सरावलेल्या गुन्हेगाराने केलेला असावा अशी पक्की खात्री पटली. मग सहकारनगर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली.
पुणे शहर पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित लंके रा. विश्रांतवाडी यानेच गुन्हा केला असल्याची पक्की खात्री पटल्यानंतर, तपास पथकातील पोलीस नाईक सतीश चव्हाण यांना बाबतची माहिती मिळाली. याबाबत तपास चालु असतांना, रोहीत लंके याला पुणे शहरातून तडीपार केले असल्याची व तो सध्या रायगड जिल्ह्यात असल्याचे समजले.
लागलीच तपास पथकाचे पोलीस माणगाव येथे गेले असता, रोहित लंके हा निजामपुर येथे भाड्याने रूम घेवून राहत असल्याचे निष्पन्न झाले. रायगड जिल्ह्यातील निजामपुर येथून मुद्देमाल जप्त करून सहकारनगर पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
धनकवडी येथील दाखल गुन्ह्यात चोरट्याने कोणताही ठोस पुरावा मागे ठेवला नसल्याने तपास करणे एक आव्हानच होते. परंतु वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती देसाई, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक युनुस मुलाणी यांच्या सुचनांनुसार
पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस हवालदार बापु खुटवड, पोलीस नाईक सतिश चव्हाण, भुजंग इंगळे, प्रकाश मरगजे, संदीप ननवरे, पोलीस शिपाई महेश मंडलिक, सागर शिंदे, किसन चव्हाण, प्रदीप बेडीस्कर, शिवलाल शिंदे, नितीन चव्हाण यांनी गुन्हेगारास ४८ तासाच्या आत जेरबंद केले.