Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

गुन्हे शाखेतील मरगळ झटकुन काढण्यासाठी भानुप्रताप बर्गे यांचा पब, सेव्हन स्टार- फाईव्ह स्टारवर रट्टा

police officer pune

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/

                पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील क्राईम बॅ्रंच ( १ ते ५ युनिट), स्पेशल ब्रँच, खंडणी विरोधी पथक, दरोडा प्रतिबंधक विभाग, सामाजिक सुरक्षा व महिलांचा अपव्यापार कक्ष, अंमली पदार्थ, प्रॉपर्टी, होमी साईड, वाहन चोरी, पीसीबी, एमओबी, गुंडा स्कॉड सारख्या विभागांना मागील काही वर्षांपासून ग्लानी आली होती,  त्यातच पुणे शहर पोलीस आुयक्तालयातील बहुतांश सर्वच वरिष्ठ अधिकार्‍यांची शहराबाहेर झालेल्या रवानगीमुळे स्वतःचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सपोआ भानुप्रताप बर्गे यांनी शहरातील पब, सेव्हन स्टार- फाईव्ह स्टार हॉटेल्स व महागड्या हुक्का पार्लरवर पदभार स्वीकारताच जोरदार रट्टा देवून बर्गे पुणे शहरात आले आहेत, याची ओळख करून दिली आहे. परंतु त्यांच्या या रट्टा मारण्यामुळे गुन्हे शाखेतील मरगळ दूर होईल की नाही यात शंका असतांनाच, श्री. बर्गे यांच्या कारवाईवर शंका उपस्थित केली जात आहे.

                पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारल्या दिवशीच पहिली कारवाई कोंढवा, मुंढवा, कोरेगाव पार्क, डेक्कन व हिंजवडी येथे दि.६ ऑगस्ट रोजी करण्यात आली. ही कारवाई सांयकाळी ६ वाजल्यापासून ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत कारवाई सुरू असल्याचे त्यांनीच दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. तसेच ७ हुक्का पार्लर चालविणारे व ५५ हुक्का पिणार्‍यांविरूद्ध कारवाई केल्याचे नमूद आहे.

                 तसेच ही कारवाई कोटपा अंतर्गत करण्यात आल्याचे नमूद असतांना, संबंधितांवर कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून, न्यायालयात रवानगी केल्याचे नमूद नाही.

एकाच हप्त्यातील दुसरी कारवाई- ना प्रेस नोट – ना पत्रपरिषद-

                सोमवार दि. ६ ऑगस्ट रोजी पहिलीकारवाई केल्यानंतर पुन्हा शनिवार दि. ११ ऑगस्ट २०१८ रोजी शहरातील नाईट लाईफवर पोलीसांंनी छापे मारल्याचे वृत्त पुण्यातील दोन/तीन वृत्तपत्रात बातमी प्रसारित झाली. ज्या ठिकाणी सोमवारी कारवाई केली, पुन्हा त्याच ठिकाणी कारवाई करण्यात आल्याचे प्रसिद्ध झालेल्या दोन वृत्तपत्रातून दिसून आले आहे. या कारवाईची माहिती पोलीस आयुक्तालयातून घेण्यासाठी वार्ताहर गेले असता, जनसंपर्क विभागाकडून काहीच प्रतिसाद देण्यात आला नाही. उलट ह्याच बातम्या आम्ही वृत्तपत्रातून वाचल्या आहेत. कारवाई बाबत अधिकृत माहिती, तसेच प्रेसनोट वा पत्रकार परिषद घेण्यात आले नसल्याची माहिती जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.

                दरम्यान या कारवाई बाबत शंका उपस्थित झाल्या आहेत. त्या अशा की.

१) पंचतारांकित हॉटेल्स, पब मधील हुक्का बहाद्दर ६ ते ७ हजार लोकांवर कारवाई केलीत, मग गुन्हे कोणत्या पोलीस ठाण्यात नोंद करून संबंधितांना कोणत्या न्यायालयात हजर केले काय…?

२) ज्या पंचतारांकित हॉटेल्स व पब वर कारवाई केली, त्यांच्यावर १८८ प्रमाणे कारवाई करून ते सील केले का… कारवाईची माहिती तहसिलदार- प्रांत यांना दिली का

३) एवढी मोठी कारवाई केली, त्याची ना प्रेस नोट, ना.. पत्रकार परिषद…? या मागचे इंगित काय…? कारवाईची माहिती अद्यापही पोलीस आयुक्तालयातील  जनसंपर्क विभागास नसावी या मागची कारण मिमांसा काय…? कारवाई नंतर एक आठवड्याने देखील ती प्रेस नोट पोलीस आयुक्तालयाच्या वेबसाईटवर नसावी याचे नेमके कारण काय आहे…?

४) पुण्यातील ज्या तीन वृत्तपत्रांना व्हॉटसअप व्दारे बातमी दिली, ती बातमी कशाचे आधारे अधिकृत मानायची… ही बाब पोलीस आयुक्त, सह आयुक्त, अतिरिक्त आयुक्त गुन्हे यांना माहिती आहे काय….?

५) पुणे पोलीस आयुक्तालयाने अधिकृत प्रेसनोट वा पत्रकार परिषदेशिवाय कोणतेही वृत्त अधिकृत मानले नाही, ही परंपरा मागील १०० वर्षापासून सुरू आहे, मग आत्ताच तो नियम कोणाच्या आदेशाने बदलण्यात आला.

६) पुणे शहर पोलीस आयुक्तालयात तीन/चार डझन सपोआ आहेत, मग त्यांना देखील हा नियम लागु झाला काय…?

७) मागील शनिवारी जो प्रकार पोलीस आयुक्तालयात झाला त्याला वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांची संमती आहे काय…? नसेल तर अशा बेधरबंद कृत्य करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई होणार काय… कारणे दाखवा, ज्ञापन जारी करणार आहेत काय…?

                अवैध धंद्यावर कारवाई करण्यास कुणाची हरकत नाहीच. परंतु  कारवाईची माहिती सर्वच पत्रकार व माध्यमांना का देण्यात आली नाही. एवढी मोठी कारवाई केलेली असतांना, त्याची पत्रपरिषद का घेण्यात आली नाही. एकाच आठवडयात दोनदा कारवाई करून देखील संबंधित हुक्का पालर्र्र, पब सुरू आहेत तरी कसे…श्री. बर्गे त्यांची शक्ती दाखवित आहेत ते नेमकं कुणाला दाखवित आहेत.. धंदेवाल्यांना की, पोलीस आयुक्तांना….!!!