रावेर/ दि/ रावेर येथ झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना वापरून फेकून देतात बाहेरील लोकांना सन्मान मात्र निष्ठावंताची अवहेलना होत आहे अशी मनातील खदखद पुन्हा एकदा एकनाथ खडसेंनी कार्यकर्त्यांसमोर मांडली. माझे मंत्रिपद गेल्याने जळगाव जिल्ह्याचे मोठं नुकसान झाल्याचं वक्तव्य खडसेंनी जाहीर कार्यक्रमात केलं.
विधानसभेत मी मांडलेल्या मुद्द्यांबाबत सरकारला एकही उत्तर देता आले नाही, स्पष्टीकरण दिले नाही. आपल्याला आपला पक्ष टिकिट देवो अथवा न देवो, जनता माझ्या पाठीशी आहे. असं वक्तव्य केल्याने खडसेंना नेमकं काय म्हणायचं आहे याचं राजकीय वर्तुळात तर्क वितर्क काढण्यास सुरवात झाली आहे.
दुसर्या पक्षातील लोकांना भाजपमध्ये मंत्रीपदे देऊन बाहेरच्यांना सन्मानाची वागणूक मिळत आहे मात्र निष्ठावंतांची अहवेलना होत असल्याचा आरोप आपल्याच पक्षात होत असल्याची नाराजी खडसेंनी बोलून दाखवली.
मी चाळीस वर्षांपूर्वी लावलेले रोपटे आता मोठे झाले आहे. मात्र, मला जसे बाजूला केले गेले, तसे तुम्हालाही एके दिवशी केले जाईल असा इशाराही कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खडसेंनी देऊन टाकला आहे. काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खडसेंनी अस वक्तव्य केल्याने एकनाथ खडसे आणि भाजपच्या अंतर्गत बरंच काही चालू आहे असं चित्र सद्या तरी दिसतंय