Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

एक (श्रीमंत) मराठा = लाख (गरीब) मराठा, मराठा समाजातील मोठ्या नेत्यांनाच आरक्षण नको- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात

कोल्हापुर/दि/
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूरातील मराठा समाजाचे मातब्बर नेते व राज्याचे माजी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजातील मोठ्या नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याचा घणाघात केला आहे. राज्य सरकारमधील बड्या मराठा नेत्यांनाच आपल्या नावापुढे बॅकवर्ड असे लिहिले जाऊ नये असे वाटते. परंतु गरीब मराठ्यांचे यामुळे जगणे मुश्किल होत आहेयाची जाणव त्यांना नाही. आपला समाज आपल्यामागे केवळ फरफटत यावा अशीच यातील अनेकांची इच्छा असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले की, गेल्या १५ वर्षात महाराष्ट्रात दोन्हीी कॉंग्रेसची सत्ता असतांना, त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले नाही. यातूनच त्यांची मानसिकता दिसून येते. मराठा समाज गरीब राहिला. तो बेरोजगार राहिला, तर यांच्यामागे तो फिरत राहील आणि हेच या मोठ्या नेत्यांना हवे आहे. गरीब मराठा समाजाचे प्रश्‍न साडेवावे असे राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीला वाटत असेल तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये १५०० कोटी रुपयांना मंजुरी दयावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.