Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस वसाहतीची केली पाहणी

पुणे/दि/ प्रतिनिधी/
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या व जुन्या पोलीस वसाहतीची पाहणी केली. पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांना भेडसावणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी लवकरात लवकर वसाहतीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त संभाजी कदम, पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख आदी उपस्थित होते.
श्री.पवार यांनी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, इमारतीची पुनर्बांधणी यासंदर्भातील चर्चेसोबतच सद्यस्थितीत पोलीस वसाहतीच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. पोलीस वसाहत परिसरासोबतच पोलीस पाल्य वसतीगृहाचीही पाहणी केली. पोलीस वसाहतीचे अत्यंत उत्कृष्ट काम करून राज्यात आदर्श निर्माण करूया, असा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.