Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शिवाजीनगरातल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करायला पुण्यातील पोलीस का घाबरतात

shivajinagarpolice

पोलीस आयुक्त कार्यालयातील गैरमहसुली अंमलदारांमुळे खात्याची बदनामी?

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
केंद्र व राज्य शासनाची व्हीआयपी व महत्त्वाची कार्यालय असलेल्या तसेच शिमला ऑफिस ते राजभवन पर्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या शिवाजीनगर हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यास पोलीस घाबरत आहेत का असा सवाल पुणे महानगरपालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये आलेले रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक विचारू लागले आहेत. दळवी हॉस्पीटल, हॉस्पीटलचा रस्ता, तेथील गाड्या, भोसले जलतरण तलाव, गार्डन, गॅरेज, जिथं तिथं जुगाराच्या चिठ्ठया लिहणारे ठायी ठायी बसले आहेत. लोकांची गर्दी होत आहे. सगळीकडे गुटखा खाऊन पचापच थुंकून घाण केली जात आहे. असे सर्वत्र चित्र असतांना पोलीस मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट अशा मनःस्थितीत असल्याचे दिसून येत आहे.

भारतीच्या विजय कुंभारांचे महान तत्वज्ज्ञान आणि गैरकायदयाचे कृत्य –
तत्कालिन पोलीस अधिकारी श्री. राजेश पुराणिक यांच्या बदलीनंतर पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी गैरकायदयाच्या कृत्याबाबत पोलीस कारवाई बाबत आम्हाला एक माहिती दिली होती. त्यानुसार ज्या ज्या पोलीस स्टेशन हद्दीत गैर कायद्याची मंडळी एकत्र येऊन बेकायदेशीर कृत्य करीत असल्यास त्याबाबत प्रथम कारवाई करण्याचे अधिकार व कर्तव्य हे संबंधित पोलीस स्टेशन यांचेचे असतात. संबंधित पोलीस स्टेशन यांनी गैरकृत्यावर कारवाई केले नाही तर सहाय्यक पोलीस आयुक्त असतात, सहाय्यक पोलीस आयुक्तांनी याबाबत कार्यवाही केली नाही तर मग पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेमार्फत कारवाई केले जाते…. गुन्हे शाखेने कारवाई केली नाही… तर मग सामाजिक सुरक्षा विभाग मेरिटनुसार कारवाई करीत असतो, असे महान उद्गार सध्या भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले व गतकाळात सामाजिक सुरक्षा विभागाची धुरा सांभाळणारे विजय कुंभार यांनी हे मत माझ्यासमोर व्यक्त केले होते. खरं तर 25/30 वर्षात एवढं तत्वज्ज्ञान कुणीच सांगितले नव्हते. आयपीसी,सीआरपीसी मॅन्यूअल मध्ये अशा कुठेच नोंदी असल्याचे मला आढळले नव्हते. एवढं मोठ्ठं ज्ञान त्यांनी मला दिले आहे. दरम्यान ही बाब कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला होता.

 सध्या शिवाजीनगर हद्दीमध्ये गैरकायदयाची मंडळी एकत्र येऊन तसेच पुणे शहर पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार एकत्र येऊन गैरकायदयाचे कृत्य करीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. तरी देखील शिवाजीनगर पोलीस कारवाई करीत नाहीत हे आज मंगळवार दि. 21 फेब्रुवारीच्या सकाळी 12 वाजेपावेतो दिसून आले आहे.  विजय कुंभार यांच्या महान तत्वज्ञानाच्या शिदोरीतील एक मुद्दा बाहेर काढल्यानंतर असे दिसून येते की, या गैरकृत्याच्या अड्डयावर सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष देत नाहीत इतर गुन्हे शाखा देखील कारवाई करीत नाहीत मग सामाजिक सुरक्षा विभाग मेरिटवर कारवाई करणे अपेक्षित आहेत. तथापी ही कारवाई होत नसल्याचे दिसून येते.शिवाजीनगरमध्ये पुणे शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराने हा बेकायदेशीर अवैद्य धंदा सुरू केला असल्याची बाब समोर आली असताना त्या संबंधित गुन्हेगारावर पुण्यातील पोलीस कारवाई का करीत नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलीस आयुक्त कार्यालयातील गैरमहसुली अंमलदार आणि गुन्हे शाखा-
वस्तुतः शिवाजीनगरा प्रमाणेच विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतही हाच प्रकार सुरू असल्याचे ज्ञात आहे. या सर्व प्रकाराला पोलीस आयुक्त कार्यालयातील गुन्हे शाखेची दोन वरीष्ठांच्या कार्यालयातील गैरमहसुली अंमलदारांची भागीदारी आडवी आली असल्याचे समजते. गंगा-जमना ही मोठ्ठी जोडी असून, या तीन पोलीस स्टेशन हद्दीत कोणत्या गुन्हेगाराचे कुठे पुर्नवसन करायचे… कुणी कुठे धंदा करायचा हे ठरवत असल्याचे समोर आले आहे. उपआयुक्त, अतिरिक्त आयुक्त या मोठ्या पोस्ट आहेत. त्यामुळे पोलीस स्टेशन देखील या गंगा-जमनाच्या पुढे नाहीत असेच काहीसे चित्र आहे. प्रसिद्ध अभिनेते दिलिप कुमार यांच्या गंगा या चरित्र नायकाप्रमाणेच उपआयुक्त कार्यालयातील गैरमहसुली अंमलदाराचे वर्तन आहे. सहकारनगरात स्वतःचे पाच गैरठेके असतांना, आता सवलतीच्या दरात भागीदारीत या उदयोगांची उभारणी सुरू असल्याचे आकलन होत आहे. त्यामुळे उपआयुक्त व अतिरिक्त आयुक्त कार्यालयातील या गंगा जमनाच्या गैरकायदयाच्या मंडळीचे पुर्नवसन प्रकल्पावर पोलीस आयुक्तांनी तातडीने प्रतिबंध आणून त्यांना आयुक्तालयातून हद्दपारीचे आदेश निर्गमित करण्याची वेळ आली आहे.