नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने मागील सप्ताहात विमानतळ पोलीस स्टेशन व सिंहगड पोलीस स्टेशन हद्दतील मजसा पार्लर, स्पा सेंटर मध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याने त्यांच्याविरूद्ध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध अधिनियमातील कलम 3, 4 व 5 सह भादवी 370 व 34 नुसार गुन्हे दाखल करून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांविरूद्ध जबर दहशत बसविण्यात आली आहे. दरम्यान कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने मागील चार महिन्यात सुमारे 8 ते 10 ठिकाणी कारवाया करून देखील अपव्यापाराची कमी शिक्षा व कमी दंडाचे कलम लावुन आरोपींवर दयामाया का दाखविण्यात आली याबाबत सामाजिक संघटना प्रश्न विचारत आहेत.
कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत अनेक वर्षांपासून सेक्स टूरिझमच्या नावाखाली मोठा वेश्याव्यवसाय चालविला जात आहे. कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, विमाननगर या ठिकाणी तर मसाज पार्लर, स्पा सेंटरच्या नावाखाली सर्रासपणे वेश्यागमन व महिला व मुलींचा अपव्यापार सुरू आहे. देश विदेशातील महिलां व मुलींकरवी वेश्याव्यवसाय चालत असल्याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी निवेदने दिलेली आहेत. दरम्यान याबाबत कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत सामाजिक सुरक्षा विभागाने 8 ते 10 ठिकाणी कारवाया केल्या आहेत. तथापी त्यांच्यावर कमी शिक्षा व दंडाची कलमे लावुन महिला व मुलींचा अपव्यापार करणाऱ्यांवर पोलीसांनी मेहेरबानी केली असल्याने अनेकांनी भुवया उंचाविल्या आहेत.
दरम्यान भादवि कलम 370 चा 7 नुसार लोकसेवक व पोलीस अधिकाऱ्यांचा कोणत्याही व्यक्तीच्या अपव्यापारामध्ये सहभाग असेल तर, असा लोकसेवक किंवा पोलस अधिकारी याला आजीवन कारावासाची शिक्षा होईल याचा अर्थ त्या व्यक्तीच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित कालावधीसाठी कारावसाची शिक्षा होईल असे या कायदयाच्या कलमात नमूद आहे. महिला व मुलींचा अपव्यापार करणाऱ्यांविरूद्ध कमी शिक्षेची कलमे लावुन त्याच्यावर दयाबुद्धी दाखविणे हा देखील गुन्हयाचा प्रकार असु शकतो काय याबाबत न्यायनिवाडे पाहणे आवश्यक ठरत आहे.
कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये कर्मचाऱ्यांचा छळ –
कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन मध्ये महिला कर्मचाऱ्यांचा छळ होत असल्याचे वृत्त नॅशनल फोरम मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. याबाबत अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी हा विषय हाताळल्याने धन्यवाद दिले असले तरी मूळ प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. पोलीस स्टेशन मध्ये महिला व पुरूष पोलीस कर्मचाऱ्यांना नियमानुसार रजा दिली जात नाही, मेडिकल रजा नाकारण्यात येते अशाही तक्रारी पुढे येत आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी हे पोलीस आयुक्त व सहपोलीस आयुक्त माझ्या ऐकण्यातले आहेत. माझी तक्रार कुठेही केली तरी मला फरक पडत नाही अशी कर्मचाऱ्यांना धमकी दिली जात असल्याबाबतचे मुद्देही पुढे आले आहेत.
त्यातही क्षीरसागर नावाचे गैरमहसुली अंमलदार पोलीस कर्मचाऱ्यांर दबाव आणून वरिष्ठांकडे नाहक तक्रारी करीत असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच हद्दीतील अपव्यापाराबाबत कारवाई करण्यास ते पुढे येत नाहीत. तसेच इतर कर्मचाऱ्यांना देखील कामे करू देत नाहीत असेही अनेकांनी मत व्यक्त केले आहे. आता त्यांच्याच मते आयुक्त व सहआयुक्त त्यांच्या मर्जीतील असतील तर कारवाई कधी होणार हे सांगताच येऊ शकत नाही एवढं मात्र नक्की.