Monday, November 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभा- विधानसभा निडणूकीतून हरविणे का आवश्यक आहे…?

महाराष्ट्रातील 800 पैकी 799 जातींना डोक्यावर घेणे परवडणारे नाही. त्यामुळे ह्यांना जाती- जाती आणि धर्मा धर्मात… हिंदू – मुस्लिम खेळात गुंतवून ठेवून 70 वर्ष सत्ता राखली व आताही पुढील 70 वर्ष आमचेच असतील.

विषय प्रवेश –
बाळासाहेब आंबेडकर व त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला निवडणूकीतून हरविणे का आवश्यक आहे याचा खालील प्रमाणे उहापोह केला आहे. देशात एकुण 6 हजार जाती आहेत. तर महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटींच्या आसपास असून राज्यात 800 पेक्षा अधिक जाती धर्माचे लोक राहतात. दरम्यान मागील महिन्यांत पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत 800 जातीपैंकी केवळ एकाच जातीचे 31 खासदार निवडणूक आणण्यात आपल्यास यश आले आहे. आता विधानसभेच्या निवडणूका देखील तोंडावर आहेत. त्यातच सध्याच्या विधानसभेत एकाट्या मराठा समाजाचे 190 आमदार आहेत. तर ओबीसींचे 11 आमदार आहेत. एससी/एसटीच्या आरक्षणाच्या 58 आमदार आहेत. दरम्यान बाळासाहेब आंबेडकर हे एससी मधील 60 जाती व एसटी मधील 60 जाती व ओबीसी मधील 450 जाती, त्यातच मुस्लिम, ख्रिश्चन, जैन धर्मातील आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या जाती जमातींमध्ये जनजागृती करून त्यांना देखील घटनेतील त्यांचे अधिकार समजुन सांगत आहेत. या सर्व जागृतीमुळे आपल्या समाजाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला हरविणे का आवश्यक आहे त्या बाबतचा उहापोह केला आहे.

1. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असले तरी ते उच्चविद्याविभुषित आहेत. कायदयाचे ते अभ्यासक म्हणून ओळखले जातात.  राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील अनु. जाती, जमाती, ओबीसी,  भटके विमुक्तांसह दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शिख धर्मियांसह आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गांचा अभ्यास आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक निवडणूक जाहीरनाम्यात शिक्षण आणि आरोग्यावर अधिक भर असतो. मागील दोन लोकसभा निवडणूकीत देशातील व राज्यातील दुर्लक्षित असलेले तृतीयपंथीय समाजाला देखील त्यांनी समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे धाडस दाखविले. अन्यथा इतर राजकीय पक्ष तर सोडा... सर्वसामान्य लोक देखील तृतीयपंथी किंवा ट्रान्संजेंडर यांच्यापासून चार हात दूर राहत होते. बाळासाहेब आंबेडकर यांनी तृतीयपंथीयांना त्यांची नवीन ओळख करून दिली.  
शासनाच्या कोणत्याही योजनेतील फॉर्मवर स्त्री किंवा पुरूष असे नमूद असायचे, दरम्यान बाळासाहेब आंबेडकर यांच्या दुरदृष्टीमुळे त्यांच्या जनजागृतीमुळे व घटनात्मक तरतुदींमुळे आता स्त्री,  पुरूष व ट्रान्सजेंडर व अन्य अशा प्रकारची फॉर्मची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांच्या शिक्षण व आरोग्याबाबत देखील काही धाडसी भुमिका बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली त्यामुळेच सध्याचे राजकीय पक्ष महिलांना लाडकी बहिण योजनां सारख्या योजना आणत आहेत. समाजातील उच्चनिच भेटभाव नष्ट करण्यासाठी त्यांचे पहिले पाऊल असते. तसेच ती योजना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे करून जागृतीचा अग्नी तेवत ठेवत असतात. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्ष देखील त्यांनी आखलेल्या योजनांना शासकीय नियमात बसवुन त्यांची अंमलबजावणी करण्याकडे कल वाढला आहे. 

2. उदया हेच बाळासाहेब आंबेडकर व त्यांचा वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यानंतर, आमचे काय होणार याची भिती राज्यातील सर्व प्रस्थापित राजकारण्यांना पडलेली असते. त्यामुळेच त्यांना थेट विरोध करता आला नाही तरी बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात कुणी ना कुणीतरी  उभे करण्याचे काम मागील 40 वर्षांपासून प्रत्येक सत्ताधारी व विरोधी पक्षांनी केले आहे. 

3. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःला सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष, जातीनिरपेक्ष असल्याचे दाखविण्यासाठी टिव्ही चॅनलेवाले, मोठे न्यूजपेपरवाले, लहान मोठे यु ट्युब चॅनेल चालविणारे तसेच  कथा, कादंबरीकार असलेल्या लेखकांना पुढे करून, त्यांना विचारवंत अशी पदवी बहाल करून, त्यांच्याकडून वंचित किंवा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरूद्ध राजकीय लिखान करवुन घेवून, त्यांना लहान मोठे पॅकेज देवून, कामाला लावले आहे. दिवस-रात्र ही माध्यमं काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच कशी फुले-शाहू- आंबेडकरवादी आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. तसेच शिवसेना व भाजपा हे हिंदूत्ववादी कसे आहेत, तेच हिंदूचे कसे संरक्षण करू शकतात यावर अधिक भर देवून प्रचार प्रसार करीत असतात. 


4. दरम्यान दलित समाज, मुस्लिम समाजाची एकगठठा मते मिळतात. त्यामुळे या दोन जातीधर्मातील पुढाऱ्यांना जवळ करून, त्यांना सत्ता व पॅकेज देवून आपलेसे करण्याचे काम देखील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. एवढच कशाला... मागील 20 वर्षाचा इतिहास पाहिला तर पुर्वीचा भारीप बहुजन महासंघातील बिनीचे नेते व कार्यकर्ते आज कुठे आहेत... मागील 5 वर्षात वंचित मध्ये स्वतःचे नाव लौकिक वाढविलेले व स्वतःला ओबीसींचे नेते अशी ओळख निर्माण केलेले बहुतांश कार्यकर्ते पुढारी कुठे आहेत असा प्रश्न केला तर, हेच वंचितचे नेते व पुढारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गळाला लागले आहेत. काही नेते तर थेटच भाजपा मध्ये गेले आहेत. त्यामुळे दलित असो की, मुस्लिम, ओबीसी असो की, भटके विमुक्त जाती जमाती. या सर्वांना घेवून बाळासाहेब आंबेडकर यांनी कृती कार्यक्रम तयार केला. त्यामुळे विविध जाती धर्मातील नेत्यांना ओळख मिळाली. स्वतःची आयडेंटी मिळाली. एक स्टेज मिळाल्याने त्यांच्या नेतृत्वाला गती मिळाली. आणि त्यानंतर तेच इतर सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या गळाला लागले. 

5. आता 1.काँग्रेस, 2.राष्ट्रवादी काँग्रेस, (शरद पवार गट + अजित पवार गट) 3. शिवसेना ( उद्धव ठाकरे गट + एकनाथ शिंदे गट) 4. भाजपा या पक्षातील सर्व खासदार पाहिले तर ते एकमेकांचे नातेवाईक, सगे सोयरे आहेत. कालपरवा झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 31 जागांवर एकट्या मराठा समाजाचे खासदार निवडूण आले आहेत. बरे तर एससी/एसटी साठी राजकीय आरक्षण आहे, त्यामुळे तरी त्यांचे पाचसहा खासदार झाले. नाहीतर त्याही जागेवर एकट्या मराठा समाजाचे खासदार निवडूण आले असते. म्हणजे 48 पैकी 48 जागांवर मराठा समाजाचे खासदार आले असते. महाराष्ट्रात ओबीसींच्या 450 जाती आहेत, तर एससीच्या 60 जाती आहेत तर एसटीच्या 60 जाती आहेत. तसेच भटके विमुक्त जाती जमाती, मुस्लिम, जैन, शिख यांच्यासह एकुण 85 टक्के बहुजन समाज जाती धर्माचे आहेत. एकुण 800 जाती महाराष्ट्रात असतांना, 800 पैकी केवळ एकाच मराठा जातीचे 31 खासदार निवडणून आले आहेत. याचा अर्थ 799 जातींना प्रतिनिधीत्व नाही असेच म्हणावे लागेल. 

6. तसेच 1.काँग्रेस, 2.राष्ट्रवादी काँग्रेस, (शरद पवार गट + अजित पवार गट) 3. शिवसेना ( उद्धव ठाकरे गट + एकनाथ शिंदे गट) 4. भाजपा या पक्षाचे आमदार पाहिले तर 190 आमदार हे मराठा जातीचे आहेत. एससी/ एसटीचे राजकीय आरक्षण असल्याने 58 जागी त्यांचे आमदार आहेत. एकुणच राज्यातील 288 आमदारांपैकी केवळ एकट्या मराठा समाजाचे 190 आमदार आहेत. 52 टक्के ओबीसींचे केवळ 11 आमदार आहेत. यावरून महाराष्ट्रात केवळ मराठा जातच सत्ताधारी आहे. ते सर्वच राजकीय पक्षात आहेत. ते एकमेकांचे सगेसोयरे आहेत, त्यांचेच सहकारी साखर कारखाने आहेत, त्यांच्याच सहकारी बॅका आहेत, त्यांच्याच दुध डेअऱ्या संस्था आहेत, त्यांच्याच सर्वाधिक सहकारी पतपेढ्या, सहकारातील सर्वाधिक जास्त संस्था एकट्या मराठा समाजाचे आहेत. महाराष्ट्रातील 800 जाती धर्मापैकी 799 जाती काय करीत आहेत. 

7. यातच खरी मेख आहे. बाळासाहेब आंबेडकर हे ह्याच 799 जाती धर्माला न्याय देण्यासाठी लढा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात 1.काँग्रेस, 2.राष्ट्रवादी काँग्रेस, (शरद पवार गट + अजित पवार गट) 3. शिवसेना ( उद्धव ठाकरे गट + एकनाथ शिंदे गट) 4. भाजपा या पक्षाचे आमदार, खासदार, एवढेच नव्हे तर त्यांच्या त्यांच्या पक्षांचे नेते, पदाधिकारी, शासनाच्या महामंडळ, कमिट्यांवरील गल्ली बोळातील पुढारी देखील टरकुन असल्याने, त्यांच्या विरोधात गरळ ओकण्याचे काम करीत असतात. वंचित विरोधात, बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात शक्य होईल तेवढी बदनामी करून त्यांना राज्याची सत्ता देण्यापासून दूर ठेवले जात आहे. 
  1. उद्या बाळासाहेब आंबेडकर सत्तेत आल्यावर काय होईल…
    1. सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षणासाठी कायदा करतील, केजी टू पीज पर्यंत सर्वांना सवलतीचे शिक्षण देतील. त्यामुळे ह्याच 1.काँग्रेस, 2.राष्ट्रवादी काँग्रेस, (शरद पवार गट + अजित पवार गट) 3. शिवसेना ( उद्धव ठाकरे गट + एकनाथ शिंदे गट) 4. भाजपा या पक्षाचे आमदार व खासदारांच्या शिक्षण संस्था असल्याने, त्यांना तो कायदा पाळावा लागणार आहे. कायदा पाळला नाही तर शिक्षण संस्था सरकार ताब्यात घेईल. त्यामुळे सर्वांना सवलतीच्या दरात शिक्षण दयावे लागेल. .सर्वांना मोफत व सवलतीच्या दरात हॉस्पीटल अर्थात आरोग्य सेवा दयावी लागणार आहे. कारण नागरीकांना शिक्षण व आरोग्य मोफत देणे हे केंद्र व राज्य शासनाचे कर्तव्य असल्याचे घटनात्मक तरतुद असल्याने त्यांची अंमलबजावणी करावी लागणार.आत ह्याच शिक्षण संस्था व बिग बजेट मोठी हॉस्पीटल्स हे याच 1.काँग्रेस, 2.राष्ट्रवादी काँग्रेस, (शरद पवार गट + अजित पवार गट) 3. शिवसेना ( उद्धव ठाकरे गट + एकनाथ शिंदे गट) 4. भाजपा या पक्षाचे आहेत. एज्युकेशन इंडस्ट्री व हॉस्पीटल इंडस्ट्री मोडीत निघेल. शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रूपये कमाविले जातात ते बंद होईल, तसेच चांगल्या आरोग्य सेवा किंवा हॉस्पीटलच्या नावाखाली जेवढी लुट सुरू आहे, ती लुट बंद होईल. थोडक्यात एज्युकेशन इंडस्ट्री व हॉस्पीटल इंडस्ट्री मोडीत निघेल. सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सहकारी सुत गिरण्या, दुध संस्था, एकुण सहकारातील कोट्यवधी रुपये येण्याचे बंद होईल त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीला हरविणे आवश्यक ठरत आहे.
    1. बेरोजगार युवक, शेतकरी, शेतमजुर, महिला, गृहिणी यांच्या आर्थिक विकासासाठी कायदे केल्याने, याच 1.काँग्रेस, 2.राष्ट्रवादी काँग्रेस, (शरद पवार गट + अजित पवार गट) 3. शिवसेना ( उद्धव ठाकरे गट + एकनाथ शिंदे गट) 4. भाजपा या पक्षाची लुटीची इंडस्ट्री बंद होईल त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांना हरविणे आवश्यक ठरत आहे.बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीला हरविण्यासाठी आज लाखो कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. राज्यातील वेगवेगळ्या शहरात…. जिल्ह्यात… न्यूजपेपरवाले, टिव्ही चॅनलेवाले, यु ट्युब चॅनेलवाल्यांना हाताशी धरून तसेच वंचित विरूद्ध तथाकथित विचारवंताना पुढे करून त्यांच्या विरूद्ध गरळ ओकण्यासाठी मोठ मोठे पॅकेज दिले गेलेले आहेत. सत्ताधारी भाजपा विरोधात लढा देण्याऐवजी, हेच 1.काँग्रेस, 2.राष्ट्रवादी काँग्रेस, (शरद पवार गट + अजित पवार गट) 3. शिवसेना ( उद्धव ठाकरे गट + एकनाथ शिंदे गट) 4. भाजपा या पक्षाचे लोक केवळ आणि केवळ वंचित विरूध्द गरळ ओकत आहेत.
    1. तुम्हालाही कायदयाचे राज्य नको असेल,
    1. तुम्हालाही केजी टू पीजी पर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण नको असेल,
    1. तुम्हालाही मोफत व सवलतीच्या दरात हॉस्पीटल व आरोग्य सेवा नको असतील,
    1. शेतकऱ्यांच्या शेतीला हमी भाव नको असेल,बेरोजगार युवकांना नोकरी किंवा बेरोजगार भत्ता नको असेल,
    1. गृहिणी, विधवा, परितक्त्या यांना त्यांच्या पायावर उभे करणारे गृहउदयोग, लघुउद्योग उभारणीसाठी मदत नको असेल,त्यासाठी कायदा नको असेल,
    1. तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर यांना हक्काच्या नोकऱ्या, उद्योगासाठी संधी नको असतील …
    1. ज्या जाती धर्मातील कार्यकर्त्यांविरूद्ध पोलीसात खोटे गुन्हे दाखल असतील, त्यांच्यावर कोर्टात तारीख पे तारीख सुरू आहे, त्यांना ती बंद करायची नसेल तर….
    तर वंचित विरोधात खुशाल मतदान करा. निवडणूका झाल्यानंतर पुढील 5 वर्ष खुशाल राजकारण्यांना शिव्या शाप देत बसा. एकमेकांची उणीदुणी काढा, जातीच्या नावाने भांडा, धर्मांच्या नावाने एकमेकांची डोकी फोडा. कोर्ट कचेऱ्या, पोलीसात वर्षानुवर्षे जात येत रहा… आणि तसेच खुशाल मरा.. एवढच बाकी राहिले आहे.