Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

अंधेरी विधानसभा पोटनिवडूकीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचितचा पाठींबा कुणाला?

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचितचा पाठींबा कुणाला?

मुंबई/दि/नॅशनल फोरम/
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाच अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे शिवसेनाच्या दोन्ही गटांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. दरम्यान शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारी ऋतूजा लटके यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठींबा दिला आहे. तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना पाठींबा जाहीर केला आहे.


त्यापार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडी कुणाला पाठींबा देणार? असा सवाल बाळासाहेब आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ॲड. आंबेडकर म्हणाले, ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्वाची आहे. मात्र आम्ही सध्यातरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. कारण एकनाथ शिंदे यांच्या गटाने उमेदवार दिला नाही.
त्याबरोबरच इतर कोणत्याही पक्षाने उमेदवार दिला नाही. मात्र भाजपने उमेदवार दिला आहे. त्यामुळे आम्ही भाजपला पाठींबा देण्याचा प्रश्नच येत नाही. सध्यातरी आमच्याकडे कोणत्याही पक्षाने पाठींबा दिला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने कोणतीही भूमिका घेतली नसल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले.