Tuesday, December 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

थांब तुला खल्लास करतो अशी धमकी देवुन, मानेवर धारदार सुरीने वार,दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

पुणे/दि/ प्रतिनिधी/
यातील फिर्यादी श्री. संतोष मालपोटे वय 42 वर्षे, रा. गणेश मळा, सिंहगड रोड हे गणेश मळा येथुन हनुमाननगर, दत्तवाडी पुणे येथे त्यांचे ओळखीचा प्रकाश कलाटकर याचेकडुन बॅन्ड वाजविणेचे काडया घेत असताना , नमुद अटक आरोपी राहुल मनोहर मोहिते वय 32 वर्षे रा. गणेश मळा सिंहगड रोड हा सदर ठिकाणी येवुन फिर्यादी यांच्या हातातील बॅन्ड वाजविणेचे काडया हिसकावुन घेवुन फिर्यादी यांना थांब तुला खल्लास करतो अशी धमकी दिली.


त्यानंतर चार ते पाच मिनिटांनी परत येवुन फिर्यादी श्री. संतोष मालपोटे यांनी बॅन्ड वाजविणेचे काडया राहुल मनोहर मोहिते याचेकडुन हिसकावुन घेतल्याचा राग मनात धरून , चिडुन जावुन त्याने फिर्यादी संतोष मालपोटे यांना शिवीगाळ करून , जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचे मानेवर धारदार सुरीने वार करुन फिर्यादी यांना गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे .
दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून त्यांचे विरूद्ध भादविक 307,504,506 , महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 ( 1 ) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवून आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिकचा तपास सहा.पो.निरी. वाय.बी.पाटील अधिक तपास करीत आहे.