Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांच्यावरील अन्यायकारक कार्यवाहीमुळे पुणे पोलीसांनी केलेली ही मार्मिक टिपण्णी

अहो फक्त निमित्तच पुरेसं असतं..!

लोकशाहीच्या अमृत महोत्सवात
एव्हरीव्हेयर ॲडजस्टमेंट असतं,
सज्जनाला रस्त्यातून हटवायला
अहो फक्त निमित्त पुरेसं असतं..!

विद्येच्या माहेरी दलालांचा बाजार
साम, दाम, दंड भेदाचा व्यभिचार,
तो मी नव्हेच म्हणत फसवायला
अहो फक्त निमित्त पुरेसं असतं..!

खोट्या श्रृंगाराची इथे होते बातमी
पतिव्रतेला नाही कुंकवाचीही हमी
ब्रेकिंग न्यूजचे खेळात संपवायला
अहो फक्त निमित्त पुरेसं असतं..!

सत्ता सारीपटात लक्ष्मीची चलती
सरस्वतीला पाहून वाटच बदलती
इथं नसतं तसं दिसतं करायला
अहो, फक्त निमित्त पुरेसं असतं..!

शब्दार्पण समर्पयामी..
मंथनामृत – 18822.