Monday, December 30 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मार्केटयार्ड, सिंहगड रोड व विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत सहा लाखापेक्षा अधिक रकमेची चोरी दरोडा

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत शहरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे पुण्यातील मार्केट यार्ड पोलीस स्टेशन, सिंहगड रोड पोलीस स्टेशन व विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे 6 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची घरफोडी व दरोड्याचे प्रकार समोर आले आहेत.

 गुन्ह्यांची हकीकत अशी की मार्केट यार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील धनलक्ष्मी ट्रेडिंग कंपनी या गाळ्यासमोरील सार्वजनिक शौचालया बाहेर फिर्यादी व त्यांचा भाऊ मार्केट यार्ड मध्ये मध्ये माल विक्री करण्याकरिता आले होते. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर लघुशंका करीत असताना जवळच झाडाखाली असलेल्या एका आरोपी इसमाने ही लघवी करण्याची जागा आहे का... येथून बाहेर जा... म्हणून मार्केटयार्ड मध्ये माल विक्री करण्याकरिता आलेल्या फिर्यादी यांना शिवीगाळ करून, हाताने मारहाण करून, त्यांच्या गळ्यातील सुमारे 65 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी विरुद्ध मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे भादविक 392, 323, 352 व 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अधिक तपास मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत 2 लाख 90 हजाराची घरफोडी-
सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील तेजस अपार्टमेंट शांतीनगर वडगाव बुद्रुक येथील फ्लॅट नंबर 24 कुलूप लावून बंद असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या राहत्या घरात प्रवेश करून बेडरूमच्या कपाटातील रोख 2000 हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख 90 हजार 700 रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला आहे.
याबाबत जगदीश घारे वय -44 वर्ष रा. सिंहगड रोड पुणे यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन यांनी अज्ञात इसमाविरुद्ध भादविक 454, 457 व 380 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार अधिक तपास करीत आहेत.

विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या दोन घटना-
पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेले विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे भर दिवसा चोरीच्या दोन घटना घडलेल्या आहेत. यापैकी तुळशीबाग सार्वजनिक रोडवर एक 32 वर्षीय महिला खरेदी करण्यासाठी गेले असताना त्यांच्या खांद्याला अडकवलेली पर्स व त्यामध्ये असलेले रोख 30 हजार रुपये व सोन्याचे दागिने असे एकूण एक लाख 75 हजार रुपये कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी महिलेची नजर चुकवून चोरून नेला आहे. संबंधित मुंबईतील अंधेरी येथे राहणाऱ्या एका 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून संबंधित अज्ञात चोरट्यावर 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार देशपांडे करीत आहेत.
विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत दुसरी चोरीची घटना घडली असून एक 75 वर्षीय जेष्ठ नागरिक तुळशी बागेतील साई अशिव दुकानात खरेदी करण्यासाठी गेले असताना, त्यांच्या गळ्यातील 32 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेली आहे.
सिंहगड रोड पुणे येथे राहणाऱ्या एका 75 वर्षीय ज्येष्ठ महिला नागरिकाने फिर्याद दिली असून आज्ञात चोरट्याविरुद्ध भादविक 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस अंमलदार साबळे करीत आहेत.