Friday, February 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे शहरात तडीपार आरोपींचा वावर… हद्दीत चोऱ्यांचा सुळसुळाट झाल्यावर पोलीसांना येते जाग…मग होते त्याची दणदणीत बातमी… अभिलेख्यावरील तडीपाराने वाहन चोरी केली…. धड्डाम…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरात सध्या कार्यरत असलेल्या पोलीस आयुक्तांनी वर्षभरापूर्वी काही ऐतिहासिक निर्णय घेतले. पुणे शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारांची पेरड घेतली. त्यात गुन्हेगारी खपवुन घेतली जाणार नाही, वेगरे वगैरे तंबी देवून झाली. गुन्हेगारी खपवुन घेतली जाणार नाही असे सांगीतले परंतु तडीपार गुन्हेगारांचा शहरात वावर झाल्यावर काय कारवाई करणार हे मात्र काहीच सांगितले नाही. असा समज काही गुन्हेगारांनी करून घेतला असल्याचे दिसून येत आहे. कित्येक तडीपार गुन्हेगार हे कोंबिग ऑपरेशनमध्ये आढळुन आल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. दरम्यान पुणे शहराच्या काही भागात सातत्याने चोऱ्या वाढल्या की, पोलीस एकदम खाड्कन्‌‍ जागे होतात. मग ही चोरी नेहमीच्या चोराने केली नाही, मग ह्या चोऱ्या कोण करीत आहे, याचा तपास केला असता, त्यात तडीपाराने ही कामगिरी केल्याचे पोलीसांना ज्ञात होते. मग तो तडीपार सापडतो आणि त्याची बातमी होते…. अभिलेख्यावरील तडीपार गुन्हेगाराला रंगेहाथ अटक… धड्डाम…

त्याचे असे झाले की, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्र. 1 गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अमित गद्रे व महेश पाटील यांना गस्तीदरम्यान गुप्त बातमीदाराने सांगितले की, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील व सध्या तडीपार असलेला इसम सोहम प्रकाश डोंगरे, सध्या रा. गणराज सह. सोसायटी विटभट्टीजवळ पाषाण पुणे हा त्याचे राहते घरी येणार असल्याचे सांगितले. त्यात नेहमी प्रमाणे पोलीसांनी कथीत सापळा रचला. त्यात त्याच्या राहत्या घरी एका मोपेड गाडीसह असल्याचे पोलीसांना दिसून आला. दरम्यान पोलीसांना पाहून तो आरोपी पळु लागला. मग पोलीसांनी त्याला त्याचे नाव, गाव, पत्ता विचारला. आरोपीने एक फटक्यात त्याचे नाव, गाव पत्ता सांगुन टाकला. 

मग मोपेड गाडी कुणाची वेगरे चौकशी केल्यानंतर ते वाहन चोरीचे असल्याचे समजले. ही चोरी  गाडी वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. मग त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला चतुःश्रृंगी पोलीसांच्या हवाली करण्यात आले. 

प्रत्येक बातमीचा व गुन्ह्याच्या तपासाचा एकच फॉर्मेट आहे. फक्त गाळलेल्या जागा भरा म्हटल्यासारखे आरोपी व पोलीसांची नावे बदलली जातात. स्टोरी मात्र सेम टू सेम असते. मुळात पुणे शहरात तडीपार गुन्हेगार येतात तरी कसे... एकुण किती तडीपार गुन्हेगार पुणे शहरात वास्तव्याला आहेत, याचा पोलीसांना काहीच ठावठिकाणा नाही. एखादया गोपनिय खबऱ्याने माहिती दिली तर समजते. परंतु सगळ्याच पोलीसांकडे खबऱ्या असतोच असे नाही. यावरून दिसून येते की, पुणे शहरात तडीपार गुन्हेगारांचा वावार आहे. परंतु अंमलदाराच रस्त्यावर नाही तर त्यात तडीपारांचा काय दोष... ते तर ऐटीत फिरणारच... गाव तसं चांगल पण वेशीला टांगल...