Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेत आवडीच्या खात्यांसाठी पुन्हा सुरू झाला घोडेबाजार

नॅशनल फोरम/ पुणे/ दि/प्रतिनिधी/
पुणे महानगर पालिकेच्या बांधकाम विभाग, टॅक्स, अतिक्रमण, आकाश चिन्ह व परवाना विभाग याच्यासह एकूण 15 महसुली खात्यामध्ये नियुक्ती मिळावी तसेच नियुक्ती मिळाल्यानंतर, पदोन्नती मिळावी परंतु त्याच खात्यात परंतु नियुक्ती मिळाल्यानंतर, पुन्हा कधीच बदली होऊ नये याच्यासाठी पुणे महानगरपालिकेतील तांत्रिक व अतांत्रिक सेवकांची नेहमी धडपड सुरू असते. दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या बाहेर अनेक संस्था, संघटना व राजकीय पक्षाने बदलीच्या घोडेबाजाराविरुद्ध तीव्र आंदोलने केली असल्याने पुणे महानगरपालिकेवे प्रशासक श्री. विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये सार्वत्रिक बदल्यांचा धडाका सुरू केला. यामध्ये तांत्रिक व अतांत्रिक विभागात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या सेवकांच्या बदल्या करण्यात आल्या. दरम्यान सार्वत्रिक बदल्यांमध्ये नको असलेल्या खात्यांमध्ये सेवकांनी त्यांच्या आवडीच्या खात्यामध्ये जाण्यासाठी धडपड सुरू केली आणि पुढे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. विक्रम कुमार व अति. आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांनी आवडीच्या खात्यात बदली मागणाऱ्या सेवकांना त्यांच्या मनपसंत आवडीनुसार बदलीखाते देण्याचा धडाका सुरू केला आहे.

 प्रशासकीय कारणास्तव या गोंडस नावाखाली हा बदलीचा घोडेबाजार तेजीत सुरू झाला आहे. दरम्यान पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री. अरविंद शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेतील बदल्यांमध्ये 30 लाख, 20 लाख याचा घोडेबाजार कसा होतो याबाबतचा तक्रार अर्ज नगर विकास मंत्रालयासह पुणे महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक श्री. विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार अर्ज देण्यात आलेला होता. आज पुणे महानगरपालिकेतील सार्वत्रिक बदलल्यानंतर पुन्हा वीस लाख, तीस लाख रुपयावरून हाच बदल्यांचा दर 50 लाख रुपयांपर्यंत गेला असल्याची पुणे महापालिकेत चर्चा आहे. ज्या सेवकांना त्यांच्या मनपसंद खात्यामध्ये बदली हवी असल्यास संवर्गानुसार त्याचा रेट ठरवण्यात आला असून संबंधित सेवकांना त्यांच्या मनपसंत खात्यामध्ये बदली देण्याचा धडाका सुरू आहे. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. विकास ढाकणे यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील उपअभियंता स्थापत्य, शाखा अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत या पदावरील कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेने प्रशासकीय कारणास्तव या गोंडस नावाखाली 17 मे 2023 रोजी सुधारित बदलांचे आदेश प्रशासकीय कारणास्तव या गोंडस नावाखाली काढण्यात आले आहेत. ज्या 135 अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या त्यातील सुमारे 41 अभियंत्यांना त्यांच्या मनपसंत खात्यामध्ये घोडेबाजाराचा दर निश्चित करून त्याची पूर्तता झाल्यानंतर ही नियुक्ती देण्यात आली असल्याचे ऐकिवात आहे. या आदेशामध्ये एकूण 41 अभियंते असून त्यांना प्रशासकीय कारणास्तव या गोंडस नावाखाली नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सेवकांची नावे खालील प्रमाणे आहेत

.
1. श्री धायगुडे मंदार उपअभियंता भवनरचना विभाग ते अतिरिक्त महापालिका आयुक्त वी कार्यालय, 2)श्री. बोडे ललित समाज कल्याण विभाग ते कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय , 3) श्री. शिंदे प्रवीण भवानी पेठ क्षे. का. ते परिमंडळ 3, 4) श्री. काटे शेखर परिमंडळ 3 ते परिमंडळ दोन, 5) श्री. पुंडे अमोल मलनिसाःरण विभाग ते बांधकाम विभाग, 6) श्री. पवार भीमराव पथ विभाग ते बांधकाम विभाग, 7) श्री. इरफान हसन नगर रोड क्षेत्रीय कार्यालय ते बांधकाम विभाग, 8) श्री. कामठे अविनाश- सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय ते बांधकाम विभाग, 9) श्री. पवार मुकेश कोथरूड बावधन क्षे. का. ते बांधकाम विभाग, 10) श्री. तांबारे दत्तात्रय पथ विभाग ते पाणीपुरवठा विभाग 11) श्री. नाडे विकास जिल्हा नियोजन ते पथ विभाग 12) श्री. भोसले योगेश उद्यान विभाग ते बांधकाम विभाग 13) श्री. तर विष्णू अतिक्रमण विभाग ते बांधकाम विभाग 14) श्री. चांदणे नितीन अतिक्रमण विभाग ते बांधकाम विभाग , 15) श्री. चाबुकस्वार संदीप पथ विभाग ते बांधकाम विभाग, 16) श्री. मरकड शरद मलःनिसारण ते बांधकाम विभाग, 17) श्री. राजेंद्र फुंदे अतिक्रमण विभाग ते बांधकाम विभाग 18) श्रीमती घोलप कामिनी अतिक्रमण विभाग ते बांधकाम विभाग 19) श्री. क्षीरसागर विक्रम मलनिस्साःरण्ा ते बांधकाम विभाग 20) श्री. गायकवाड मंगेश अतिक्रमण विभाग ते बांधकाम विभाग, 21) श्री. विधे पियुष अतिक्रमण विभाग ते बांधकाम विभाग, 22) श्रीमती खोपडे शितल शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय ते बांधकाम विभाग, 23) श्री. राऊत हरिश्चंद्र ढोले पाटील रोड ते उद्यान विभाग, 24) श्री. दीपके संदीप ढोले पाटील रोड ते पाणीपुरवठा विभाग, 25) श्री. पठाण शाहिदखा येरवडा क्षेत्रीय कार्यालय ते पाणीपुरवठा विभाग, 26) श्रीमती काथवटे श्रद्धा नगर रोड क्षेत्रीय कार्यालय ते पाणीपुरवठा विभाग, 27) श्री. पाटोळे रमेश सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय ते शिक्षण विभाग 28) श्रीमती मनीषा मनोहर पिसाळ शिक्षण विभाग ते पाणीपुरवठा 29) श्रीमती देवकर भाग्यश्री वारसा विभाग ते मलःनिसारण 30) श्री. रजपूत राजकुमार देशमुख घनकचरा विभाग ते मलःनिसारण 31) श्रीमती ढमढेरे प्रज्ञा पाणी पुरवठा विभाग ते सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, 32) श्रीमती नष्टे आरती भवन रचना ते पाणीपुरवठा 33) श्री. धोत्रे अतुल अतिरिक्त मनपा आयुक्त ते बिबेवाडी क्षे. कार्यालय 34) श्री. आंबे पंकज बिबवेवाडी कार्यालय ते अतिरिक्त आयुक्त विशेष 35) श्रीमती बेंद्रे सोनाली विद्युत विभाग ते पाणी पुरवठा विभाग, 36) श्री. जाधव सूर्यभान विद्युत विभाग ते कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय, 37) श्री. गावडे अंकुश पथ विभाग ते पाणीपुरवठा विभाग 38) श्रीमती मोरे मोनाली कसबा विश्रामबाग अशा एक ते 41 अभियंत्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

 दरम्यान शाखा अभियंता उमेश शिद्रुक यांच्या कडील आकाश चिन्ह व परवाना विभागाकडील सोपवलेले तांत्रिक स्वरूपाचे कामकाज या आदेशाने संपुष्टात येत असून आकाशचिन्ह व परवाना विभागाकडील सोपवलेले तांत्रिक स्वरूपाचे कामकाज श्री. भागवत त्रंबक नाथा कनिष्ठ अभियंता यांच्याकडे सोपवण्यात येत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

 तसेच पाणीपुरवठा विभागाकडे श्री.मुल्ला अन्वर हुसेन रमजान शाखा अभियंता यांच्याकडील हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडील अतिरिक्त कामकाजाचा पदभार संपुष्टात आणला असून त्यांनी पूर्ण वेळ पाणीपुरवठा विभागाकडे कामकाज करायचे आहे तसेच श्रीमती प्रज्ञा ढमढेरे कनिष्ठ अभियंता यांच्याकडील येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्याकडील अतिरिक्त पदभार संपुष्टात आणण्यात आलेला आहे. दरम्यान अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी नमूद केले आहे की वरील बदली झालेल्या सेवकांनी आदेश हाच कार्यमुक्ती आदेश समजून नवीन कामकाजाच्या खात्याकडे त्वरित रुजू व्हावे यासाठी स्वतंत्र कार्यमुक्ती आदेशाची आवश्यकता नाही. नवीन कामकाजाच्या खात्यामध्ये रुजू झाल्याबाबतचे निवेदन सेवकाने आस्थापना विभागाकडे सादर करायचे आहे.

 मनपा सेवा नियमानुसार वेतन व भत्ते हे त्यांचे वेतनाच्या खात्यामध्ये अदा करायचे आहेत. विविध क्षेत्रीय कार्यालयाकडील कार्यरत कनिष्ठ अभियंता यांनी अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून वेळोवेळी होणाऱ्या मागणीनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामकाज करायचे आहे, अशा बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत.

अ तांत्रिक सेवकांच्या बदल्या-
दरम्यान उपअधिक्षक या प्रशासनाकडील संवर्गातील सेवकांच्या बदल्या 22 मे रोजी करण्यात आलेले आहेत. यामध्ये श्रीमती यमुना करवंदे व श्रीमती जोरी माधवी शेखर यांच्या खात्यामध्ये आदलाबदल करण्यात आलेले आहे. वरिष्ठ लिपिक वर्ग 3 तीन याच्यामध्ये श्रीमती खेसे, श्री जयनाथ, श्री मंडलिक व श्री पारधी या चार सेवकांनी आपापसात खात्यांची आदलाबदल करून श्री रवींद्र बिनवडे यांनी प्रशासकीय कारणास्तव बदल्यांचे आदेश काढण्यात आलेले आहेत.

 दरम्यान प्रशासकीय सेवेतील लिपिक टंकलेखक श्रेणीतील यांच्या एकूण दहा सेवकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये श्री. सुरेंद्र तरटे, श्रीमती पुष्पा टिळेकर, श्री आनंद कुचेकर, श्री धनवडे युवराज, श्रीमती गायकवाड दीपावली श्रीमती राडे वैशाली श्रीमती गोगावले अशा श्री ऋषिकेश गायकवाड , श्रीमती बाळसराफ कीर्ती, श्रीमती जाधव सुजाता यांनी देखील आपआपसामध्ये संगनमत करून खात्यांची आदलाबदल केली असल्याचे दिसून येत आहे. अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांनी सदरील आदेशावर 22 मे 2023 रोजी सह्या करून हा आदेश जारी करण्यात आलेला आहे. थोडक्यात घोडा बाजार अतिशय तेजित असून पुणे महानगरपालिकेतील सेवक संगनमताने आपापसात खात्यांची अदलाबदल करीत आहेत.  अभियंता संवर्गातील सेवक त्यांना पाहिजे असलेल्या मनपसंत खात्यामध्ये पदभार मिळवत आहेत. एकंदरीत या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी अनेक संघटनांकडून करण्यात येत आहे.