Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

The gift of the market committee with the police to the moneylender-gamblership in the market yard # मार्केटयार्डातील सावकारी-गॅम्बलरशाहीला पोलीसांसह बाजार समितीचे वरदान

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. ५ यांच्या कार्यक्षेत्रातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत मटका जुगार आणि क्लब सारखे गॅम्बलिंगचे प्रकार सर्रास झाले आहेत. जिथं कुठं जावे तिथे जुगार अड्डे फुल्ल वाहत असतांना दिसत आहेत. पोलीसांचा कुठेही धाक दिसत नाही. बाजार समिती आवारात एखादे वाहन लावले तर बाजार समिती २०० रुपयांचे दंड आकारते. पण जुगार अड्ड्यांबाबत मात्र मौन बाळगुन आहे. थोडक्यात मार्केटयार्ड परिसर व मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दतील जुगारांना पोलीसांचे वरदान असल्याचे दिसून येत आहे.


आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून पुण्यातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केटयार्डाचा क्रमांक लागतो. त्याच मार्केटयार्डाला मटका, जुगारासह अवैध धंद्याचे ग्रहण लागले आहे. क्लबच्या माध्यमातून तर मार्केटयार्डातील सर्व खाजगी सावकर एकत्र येत आहेत. तसेच बेकायदा सावकारी करणार्‍यांकरून तर व्यापारी व नागरीकांची छळवणूक केली जात आहे. पोलीसांत दाद मागावी तर पोलील गुन्हेगार असलेल्या खाजगी सावकार आणि अवैध धंदेवाल्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याची अनेक उदाहरणे सांगितली जात आहेत. थोडक्यात मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत निव्वळ मटका, जुगार अड्डे एवढेच नसून खाजगी सावकारी सोकावलेली आहे.
झोपडपट्टीतील मुलांना भाईगिरीचे कुप्रशिक्षण देवून, खाजगी बेकायदा सावकारी करणार्‍या इसमांकडून त्यांचा वापर केला जात आहे. थोडक्यात आता शाळाही बंद आहे, झोपडपट्टीतील कट्टे न् कट्यांवर आता घोडा आणि कट्ट्याची चर्चा, भाईगिरीची चर्चा झडत आहे. खाजगी सावकार यांच्या फायदयासाठी लहान मुलांचा वापर खाजगी सावकारी वसुलीसाठी करून घेत आहेत. तसेच अवैध धंदेवाल्यांकडून टपोरी गँगला भुरळ पाडून त्यांच्या धंदयासाठी पंटर तयार केले जात आहेत. ही बाब भयंकर स्वरूपाची असून अशा प्रकारच्या अवैध धंदयावर तातडीने कारवाई करून, खाजगी सावकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. परंतु पोलीस उपआयुक्त परिमंडळ कार्यालयालया याचे काही देणे घेणे नाही आणि मार्केटयार्ड पोलीस स्टेशन मोकाट सुटले आहे. त्यामुळे न्याय कुठे मागायचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.