
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
खुन झालेला इसम मूळचा बिहारचा… खुन करणारा पश्चिम बंगालचा…तपास पुण्यासह पश्चिम बंगालमध्ये… हावडा रेल्वे स्टेशनवर खुनी सापडला… बंगाल मधील गोलाबारी पोलीस स्टेशन, हावडा येथून आरोपीस अटक… सर्व कथानक एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच आहे. परंतु महत्वाचे म्हणजे खुन झालेला इसम व खुनी इसम याची कोणतीही माहिती या भागात नव्हती. परंतु भारती विद्यापीठ पोलीसांनी खुन झालेला इसम व खुनी इसम याचा माग काढत… खऱ्या आरोपीस जेरबंद केले त्याची ही हकीकत…
दि. 10 फेब्रुवारी 2025 रोजी रात्रौ साडेबारा वाजता 28 तोरणा मोहर विल्डिंग, चिंतामणी चौकाजवळ आंबेगाव पठार पुणे येथील बांधकाम चालू असलेल्या साईटच्या पहील्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक 104 मध्ये कोणीतरी अज्ञान इसमाने सदरचे अनोळखी इसमास, कोणत्यावरी अज्ञात कारणावरुन, कोणत्यातरी हत्याराने, त्याचे डोक्यात मारून, त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला आहे, म्हणून राहुल लक्ष्मण आवारी नेमणुक भारती विदयापीठ पोलीस स्टेशन यांनी सरकार तर्फे फिर्याद दिली. भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर 114/2025 भारतीय न्याय संहीता सन 2023 चे पलम 103 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयातील मयताची बॉडीचे विघटन होवु लागल्यामुळे मयताचे चेहरा नीट दिसत नव्हता. तसेच मयताबाबत घटनास्थळावरील नागरीकांकडे विचारणा केली असता, मयत इसमाबाबत काही उपयुक्त माहीती मिळाली नाही, त्यामुळे मयत इसम ओळखणे हे पोलीसांना कठीण झाले होते. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी व तपास पथकाचे पोलीस अंगलदार यांना मयत इसमाची ओळख पटपुन आरोपीचा शोध घेण्याबाबतच्या सुचना दिल्या.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी व तपास पथकाचे पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळावर मिळून आलेल्या रक्ताने माखलेल्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केला. त्यावरुन मयत इसमाचे नाव नयन गोरख प्रसाद, वय 45 वर्षे, रा. मुळ रा. गाव दुमडा, तहसील तारवारा, जि. सिवान, बिहार असे असल्याची खात्री झाली. त्यापुढे मयत इसम नयन गोरख प्रसाद याचे मोबाईल फोनचा तांत्रिक तपास केला असता त्यामध्ये मयत इसमाचे सोबत विरण सुबल करकर, ऊर्फ विरण सुरत कर्माकर, यय 30 वर्षे, रा. बजे विडोल, विंडोले, रायगंज, परीवाल, उत्तर दिनाजपुर, पश्चिम चंगाल 733156 हा इसम असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली.
आरोपी विरण सुबल करकर, ऊर्फ बिरण सुबल कर्माकर याचा शोध घेत असताना तो पश्चिम बंगाल येथे गेल्याची माहीती मिळाल्याने मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश पवार, अभिनय चौधरी यांनी पश्चिम बंगाल येथे जावुन नमुद आरोपीचा शोध घेतला असता, तो हावडा रेल्वे स्टेशन भागात मिळून आल्याने त्यास नमुद गुन्हयात गोलाबारी पोलीस स्टेशन, हावडा, पश्चिम बंगाल येथे दिनांक 12/02/2025 रोजी अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, प्रविणकुमार पाटील सो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील सो, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2, विवेक मासाळ, पोलीस उपआयुक्त, आथिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे, राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली
भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, प तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार चेतन गोरे, महेश बारवकर, मंगेश पवार, राधिन सरपाले, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे.