Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: #सोमनाथ बनकर #शिवाजी दौंडकर

पुणे महापालिकेत पदांसाठी पैशांचा बाजार भरलाय?

पुणे महापालिकेत पदांसाठी पैशांचा बाजार भरलाय?

शासन यंत्रणा
जो जास्त भ्रष्टाचार करणार, त्यालाच मोठ्या पदावर पदस्थापना मिळणार,मेरिट/गुणवत्तेच्या निव्वळ बाताच मारणार, प्रत्यक्षात थैली किती वजनदार आहे, त्यावरच सर्व अवलंबुन असते. नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाणपुणे महापालिकेत पैशांचा बाजार भरलाय… जो उठतो तो प्रभारी पदभार घेवून त्याच्या सध्याच्या पदापेक्षा मोठ्या पदांवर पदस्थापना घेतल्याचे दिसते. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात तर ज्या अभियंत्याला पहिल्या टप्प्यातील पदोन्नती देखील मिळाली नाही, त्याला थेटच प्रभारी उपअभियंता म्हणून पदस्थापना दिली, कालपर्यंत अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका सेवकाला थेटच प्रशासन अधिकारी या पदाचा अनुभव डिलिट मारून त्याला थेट सहायक आयुक्त पदावर बसविले. मागील आठवड्यात उपआयुक्त पदांचा तपशील जाहीर केला, त्यात संदीप कदम, सोमनाथ बनकर, चेतना केरूरे,आशा राऊत यांना थेट महत्वाच्या व मोठ्या पदांवर नियुक्ती दिल्याचे दि...