Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: वंचितने इंडिया विरोधात उमेदवार देऊ नये

“वंचितने इंडिया विरोधात उमेदवार देऊ नये”, रोहित पवारांच्या वक्तव्यावर सुजात आंबेडकर म्हणाले, “त्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने”

“वंचितने इंडिया विरोधात उमेदवार देऊ नये”, रोहित पवारांच्या वक्तव्यावर सुजात आंबेडकर म्हणाले, “त्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने”

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/भाजपाप्रणित एनडीएविरोधात देशातले 28 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारविरोधात तयार केलेल्या आघाडीला ….. (इंडिया) असं नाव दिलं आहे. या आघाडीत महााष्ट्रातले दोन पक्ष सहभागी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या आघाडीचे सदस्य आहेत. परंतु, देशात काही पक्ष असे आहेत जे एनडीएचे सदस्य नाहीत त्याचबरोबर इंडिया आघाडीचेही सदस्य नाहीत. यापैकी काही पक्ष इंडिया आघाडीत सहभागी होण्यास इच्छूक आहेत. असदुद्दीन ओवैसी यांचा एआयएमआयएम आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष इंडिया आघाडीत सहभागी होण्यास इच्छूक आहेत. परंतु, इंडिया आघाडीने त्यांना आघाडीचं निमंत्रण दिलेलं नाही. एमआयएम आणि वंचितच्या काही नेत्यांनी इंडिया आघाडीने त्यांना सामावून घ्यावं अशी इच्छा अनेकदा व्यक्...