Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: #नगरविकास मंत्रालय

पुणे महापालिकेतील सामान्य प्रशासनचे कार्यालय की कोंडवाडा,

पुणे महापालिकेतील सामान्य प्रशासनचे कार्यालय की कोंडवाडा,

शासन यंत्रणा
*अ वर्ग पुणे महापालिकेतील प्रशासकीय कार्यालयाची अवस्था, मुंबईतील बीडीडी चाळ आणि पुण्यातील जनता वसाहतीसारखी…*एसटी आणि रिक्षात प्रवाशी कोंबुन भरावे तसे, प्रशासकीय सेवक व फाईलचे गठ्ठे ठेवले आहेत, पावसाळ्यात तर कागदांच्या कुबट वासाने थांबुही वाटत नाही… मग सेवक कसे काम करीत असतील… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यात हडपसर ते स्वारगेट, कात्रज ते स्वारगेट, मार्केट ते मंडई, मंडई ते स्वारगेट या प्रवासा दरम्यान शेअर ऑटो रिक्षामध्ये जसे प्रवाशी कोंबुन भरले जातात किंवा पुणे शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना जसे रिक्षावाले काका कोंबुन-कोंबुन भरतात तशी अवस्था सध्या पुणे महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाली आहे. मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळ आणि पुण्यातील जनता वसाहतीमधील घरे जशी एकमेकांना चिकटून आहेत, आणि त्यातुन जसा कुबट वास दुरपर्यंत पसरलेला असतो तशी अवस्था सामान्य प्...