Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त श्री. माधव जगताप

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सत्ताधारी पक्षाला झुकते माप दिल्याने, शहराचे विद्रुपिकरण वाढले – अतिक्रमण निरीक्षक वसुलीवर मग कारवाई करणार कोण…

पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सत्ताधारी पक्षाला झुकते माप दिल्याने, शहराचे विद्रुपिकरण वाढले – अतिक्रमण निरीक्षक वसुलीवर मग कारवाई करणार कोण…

शासन यंत्रणा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाने सत्ताधारी भाजपा-शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाला झुकते माप दिले असल्याने पुणे शहरात फ्लेसबाजीला उधाण आले आहे. संपूर्ण शहराचे विद्रुपिकरण होत आहे. परंतु दुसऱ्या बाजुला विरोधी पक्ष किंवा सामाजिक संघटनांचे बॅनर मात्र रात्रोरात काढले जात आहेत, त्यांच्यावर दंडही आकारला जात आहे. यामुळे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त श्री. माधव जगताप हे सत्ताधारी पक्षाला झुकते माप देत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. दरम्यान सत्ताधारी पक्षांकडून दरदिवशी पुणे शहरात फ्लेक्सबाजी वाढत चालली असल्याने पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुणे महापालिका हद्दीत फ्लेक्स किंवा होर्डींग उभे करण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून शुल्क भरून घेवून परवानगी दिली जाते, मात्र, महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न...