Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Widespread use of Article 353

कलम 353 चा पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांकडून दुरूपयोग<br>आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर कलम 353 चा सर्रास वापर

कलम 353 चा पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांकडून दुरूपयोग
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर कलम 353 चा सर्रास वापर

राजकीय
पुणे/दि/नॅशनल फोरम/शिवाजीनगर मार्गावरील एका पीएमपीएमएल बसने पुरम चौकात सिग्नल लागल्याने समोर असलेल्या कारला पाठीमागुन धडक दिली. कारमधील इसमांनी संबंधित बस चालकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. म्हणून कारचा चालक तसेच इतर तीन इसमांविरूद्ध भादवी 353 चा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी घटना कोंढवा येथील असून पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील कर्मचारी मिळकतीच्या जप्तीचे वॉरंटची बजावणी करीत असतांना, मिळकतकर धारक संबंधित कर्मचाऱ्याच्या अंगावर धावुन येऊन अपशब्द वापरल्याने संबंधित नागरीकावर शासकीय कामात अडथळा केला म्हणून त्याच्या विरूद्ध भादवी 353 चा गुन्हा दाखल केला आहे. तिसरी घटना- पुणे महापालिकेवर दलित पँथरच्या मोर्चाव्दारे पारधी समाजाच्या न्याय मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यासाठी जात असतांना, महापालिका आवारात असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, राष्ट्रपिता महात्मा फुलेंचा व...