Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Vinayak Gaikwad Anti Narcotics Squad Pune

अंमली पदार्थांच्या तस्करीतील फरार आरोपींची, विनायक गायकवाड यांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडून धरपकड<br>लोणीकंद व येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील ड्रग्जमाफियांच्या मुसक्या आवळल्या

अंमली पदार्थांच्या तस्करीतील फरार आरोपींची, विनायक गायकवाड यांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 1 कडून धरपकड
लोणीकंद व येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील ड्रग्जमाफियांच्या मुसक्या आवळल्या

पोलीस क्राइम
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे शहरात गांजा, मेफेड्रॉन, चर्रस, अफिम, कोकेन सारखी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर धाडीचे सत्र सुरू असतांनाच, कारवाई करतांना फरार आरोपींची देखील कसुन चौकशी करून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 कडून करण्यात येत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड यांच्यासह संपूर्ण पथकाकडून धडपकडीचे सत्र सुरू आहे. सलग दोन दिवसात अनेक आरोपी पकडले गेले असून येरवडा व लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. काल संगमवाडी येथील संगमवाडी ब्रिज परिसरात इसम नामे अफजल इमाम नदाफ व अर्जुन विष्णु जाधव हे मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करीत असताना अंमली पदार्थ विरोधी पथक 1 यांना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. 11/2023 एन. डी. पी...