Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Taljai hill was solved

तळजाई टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खुनाचे रहस्य उलगडले साडेतीन वर्षांनतर…पर्वती पोलीसांची कामगीरी

तळजाई टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खुनाचे रहस्य उलगडले साडेतीन वर्षांनतर…पर्वती पोलीसांची कामगीरी

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कानुन के हात बहोत लंबे होते असं आपण नेहमी ऐकतो. चित्रपटातही याचे डॉयलॉग असतात. दरम्यान पोलीस अधिकारी कणखर असतील तर कायदा आणखीन बळकट होतो. त्याचा प्रत्यय पर्वती पोलीस स्टेशन मध्ये आला आहे. पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयराम पायगुडे यांच्यासह पो.नि. गुन्हे श्री.विजय खोमणे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामटे, पोलीस अंमलदार राजू जाधव, कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, अंनिस तांबोळी, अमित सुर्वे, सद्याम शेख, ज्ञानेश्वर शिंदे, सुर्या जाधव यांनी साडेतीन वर्षापूर्वी झालेल्या खुनाचे रसह्य उलगडले आहे. अत्यंत किचकट व कोणताही पुरावा नसतांना, अतिशय पारंपारीक पद्धतीने पर्वती पोलीसांनी तपास करून गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. त्याबाबतची हकीकत अशी की,दि. 17 ऑगस्ट 2020 रोजी पर्वती टेकडीच्या वरील बाजूस जंगलामध्ये पडक्या पाण्याच्या टाकी...