शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या भैय्यावाडीतील मटका जुगार अड्डा बंद का होत नाही… घ्या, आजच्या मटका आकड्यांच्या चिठ्ठ्या
पुणे शहर पोलिसांची सराईत गुन्हेगारांसह, गुन्हेगारी टोळ्यांना हस्ते परहस्ते आर्थिक मदत…
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी, तसेच नागरीकांशी वाद काढुन आपल्या टोळीचे वर्चस्व वाढावे, जनमानसात दहशत राहावी यासाठी गुन्हेगारी टोळ्या संघटीतपणे दहशतीने स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता गुन्हे करीत असल्याचे निष्कर्ष पुणे शहर पोलीसांनी काढलेले आहेत. परंतु याच दहशतीचा वापर करून पुढे जाऊन मटका जुगार अड्डे, रमीचे क्लब, पणती पाकोळी सारखे सोरट, अंमली पदार्थांची विक्री, पब, हुक्का पार्लर, मसाज पार्लर, स्पा आदिंसारखे अवैध व बेकायदेशिर धंदे करून ह्याच गुन्हेगारी टोळ्या आर्थिक संपन्न होत आहेत. त्यात पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान उभे करीत आहेत. त्यामुळे पुणे शहर पोलीसांनी पुणे शहरातील खाजगी सावकारी आणि अवैधपणे सुरू असलेले मटका जुगार अड्डे तातडीने बंद करण्याची सामाजिक संघटना...