Wednesday, January 1 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: stolen by a highly educated thief

पुण्यात मोबाईल चोराची हेराफेरीः उच्चशिक्षित चोराकडून 17 मोबाईलची चोरी, चोरीचे मोबाईल विकण्यासाठी नामांकित कंपनीच्या बीलांची हेराफेरी…

पुण्यात मोबाईल चोराची हेराफेरीः उच्चशिक्षित चोराकडून 17 मोबाईलची चोरी, चोरीचे मोबाईल विकण्यासाठी नामांकित कंपनीच्या बीलांची हेराफेरी…

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यासारख्या उच्च शिक्षितांच्या शहरात ऑनलाईन सायबर क्राईम अफाट वाढलेले आहे. परंतु छापिल बिलांमध्ये देखील हेराफेरी करता येते हे देखील पुण्यातील लबाड चोरांनी करून दाखविले आहे. परंतु कानुन के हाथ बहोत लंबे होते है हे मात्र पुण्यातील चोर कदाचित विसरले असतीलही… परंतु कानुन के हाथ बहोत लंबे होते है, हा प्रत्यय शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधील चोरीच्या प्रकरणांने समोर आला आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की,शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील, शिवाजीनगर जुना तोफखाना भागात फिर्यादी यांचे स्वतःचे फर्निचरचे दुकानात दिनांक 04/01/2024 कामात व्यस्त असताना त्यांचा काउंटरवर ठेवलेला सॅमसंग कंपनीचा असलेला मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे तक्रारी वरुन शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि क्र.20/2024 भादवि क. 380 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे वरि...