दिल्लतील महाराष्ट्र सदनातून सावरकर जयंतीसाठी सावित्रीमाई फुले, अहित्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविले, छगन भुजबळांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा – बाळासाहेब आंबेडकर
दिल्लतील महाराष्ट्र सदनातून सावरकर जयंतीसाठी सावित्रीमाई फुले, अहित्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविले, छगन भुजबळांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा - बाळासाहेब आंबेडकर
मुंबई/दि/ प्रतिनिधी/छगन भुजबळ स्वतःला ओबीसीचे नेते म्हणवितात, दिल्लीतील महाराष्ट्र सदन त्यांच्याच कार्यकाळात बांधण्यात आले आहे. आज त्याच महाराष्ट्र सदनातून क्रांतिज्योति सावित्रीमाई फुले व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हटविले गेले याचा निषेध म्हणून छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात 29 मे रोजी पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष...