Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: sscellpune

सामाजिक सुरक्षा विभागाची 12 अ ची कारवाई आणि विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांचं आर्थिक पुर्नवसन करणारी अर्थनिती

सामाजिक सुरक्षा विभागाची 12 अ ची कारवाई आणि विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांचं आर्थिक पुर्नवसन करणारी अर्थनिती

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumपुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने संपूर्ण पुणे शहरात मटका जुगार अड्डयांवर कारवाया होत असल्याच्या बातम्या नियमित येत असतांना, ज्यांच्यावर कारवाई झाले ते धंदे देखील पुनः तासा/दोन तासात सुरू होत आहेत. तर नवीन पोलीस आयुक्तांच्या भीतीने बंद पडलेले अवैध मटका जुगार अड्डे देखील पुनः नव्याने सुरू झाले आहेत. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगाराचं आर्थिक पुर्नवसन करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. दरम्यासन पुणे शहरात 10 हजार 973 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सुमारे 12 टोळ्यांमधील 75 गुन्हेगारांवर मकोका दाखल करण्यात आला आहे. तसेच 4 गुन्हेगार स्थानबद्ध केले असून 43 सराईत गुन्हेगारांना तडीपार करून पुणे शहरात दशहत निर्माण करणाऱ्या व सक्रिय गुन्हेगारांवर कडक प्रतिबंध कारवाई करण्याचे धोरण पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी अवलं...