दरबारी नाव सिंहगड पोलीस स्टेशन, कारभार मात्र निजामशाही- आदिलशाहीसारखा… कॅसिनोला राज्यात बंदी, तरीही सिंहगड हद्दीत मात्र विभागुन कॅसिनो चालविला जातो…
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर व त्यांच्याही काळात अर्ध्या महाराष्ट्रावर आदिलशाही व निजामशाहीचा कारभार सुरू होता. पुणे, सुपे व बारामती हे तर विजापुरच्या आदिलशाहीचा महसुली परगणा होता. ब्रिटीश भारत व स्वतंत्र भारतात आदिलशाही, निजामशाही संपुष्टात आली तरीही मनांमधील आदिलशाही आणि निजामशाहीचा कारभार अजुन निघालेला नसल्याचे दिसून येत आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीचा कारभार देखील विजापुरच्या आदिलशाहीला साजेसा असाच असल्याचे दिसून येत आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कॅसिनोला बंदी आणलेली आहे. असे असतांना, एका कॅसिनो मध्ये गैरकायदयाच्या ज्या ज्या बाबी असतात त्या त्या सर्व सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत जागोजाग दिसून येतात. कॅसिनो मध्ये असलेले वेगवेगळे विभाग, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. थोडक्यात सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडुन ...