शिवाजीनगर न्यायालय की शिवाजीनगर कोर्ट कॉलेज, आज आज शिवाजीनगर न्यायालयात आरोपी, गुन्हेगार, कैदी आणि त्यांच्या समर्थकांची तोबा गर्दी
पुणे शहरात पोलीस- गुन्हेगारांचे समांतर आर्थिक प्रशासन चालविले जात आहे काय….
पुण्याचे पालकमंत्रीपद अजितदादांकडे आल्यानंतर, समांतर प्रशासन यंत्रणा मोडून काढली जाईल काय…
इजी मनीचे आर्थिक सोर्स असलेल्या मटका जुगार अड्डे, खाजगी सावकारी, अंमली पदार्थांवर जबरी कारवाई हाच एक मार्ग
खात्याचे मुखबिर पळुन गेले आहेत…की सक्तीच्या रजेवर
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्याच्या पालकमंत्रीपदी पुनः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांची वर्णी लागली आहे. दरम्यान कोरोना महामारी लॉकडाऊन पासून पुणे शहरात कोयता गँगची दहशत निर्माण झाली, त्यानंतर झपाट्याने गुन्हेगारी वाढत चालली आहे. तत्कालिन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे कार्यकाळापासून मोक्का व एमपीडीए खाली किती गुन्हेगारांवर कारवाई केली, त्याची आकडेवारी जाहीर केली जात आहे. त्यात गुन्हेगारांवर चाप बसण्याऐवजी गुन्हेगारी अधिक वाढत असल्...