Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Shivaji Nagar gambling den

आनंदाची बातमीः शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मटका जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई

आनंदाची बातमीः शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मटका जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई

पोलीस क्राइम
आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीजनॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे महापालिकेच्या दळवी हॉस्पीटल मागे भैय्यावाडी येथे मटका जुगार अड्डे चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली असून, संबंधितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 12 (अ) प्रमाणे कारवाई करून आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवल्याची माहिती विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्री. वसंत कुवर यांनी नॅशनल फोरम यांना लेखी पत्राव्दारे कळविले आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे महापालिकेच्या दळवी हॉस्पीटल पाठीमागे भैय्यावाडी येथे मटका जुगार अड्डा व क्लब सुरू असल्याची बातमी ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये नॅशनल फोरम मध्ये प्रसारित केली होती. बातमीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त पुणे शहर व सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग यांना अवगत करण्यात आले होते. त्याचा परि...
शिवाजीनगरातल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करायला पुण्यातील पोलीस का घाबरतात

शिवाजीनगरातल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करायला पुण्यातील पोलीस का घाबरतात

पोलीस क्राइम
shivajinagarpolice पोलीस आयुक्त कार्यालयातील गैरमहसुली अंमलदारांमुळे खात्याची बदनामी? पुणे/दि/ नॅशनल फोरम/केंद्र व राज्य शासनाची व्हीआयपी व महत्त्वाची कार्यालय असलेल्या तसेच शिमला ऑफिस ते राजभवन पर्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या शिवाजीनगर हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यास पोलीस घाबरत आहेत का असा सवाल पुणे महानगरपालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये आलेले रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक विचारू लागले आहेत. दळवी हॉस्पीटल, हॉस्पीटलचा रस्ता, तेथील गाड्या, भोसले जलतरण तलाव, गार्डन, गॅरेज, जिथं तिथं जुगाराच्या चिठ्ठया लिहणारे ठायी ठायी बसले आहेत. लोकांची गर्दी होत आहे. सगळीकडे गुटखा खाऊन पचापच थुंकून घाण केली जात आहे. असे सर्वत्र चित्र असतांना पोलीस मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट अशा मनःस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. भारतीच्या विजय कुंभारांचे महान तत्वज्ज्ञान आणि गैरकायदयाचे कृत्य -...