काल शिवसेना फुटली… आज राष्ट्रवादीत गट पडले, थोडक्यात… सत्ताधारी प्रबळ पक्ष लहान पक्षांना खिळखिळे करतात, फुट पाडतात हेच खरे
नॅशनल फोरम/अनिरूद्ध शालन चव्हाण…..काल पर्यंत कै. बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील गटातटांवर नेहमी भाष्य करीत असत. काय हे गट… काय हे तट… म्हणून खिल्ली उडवली जात होती. देशातवर स्वातंत्र्यानंतर 60 वर्ष सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने तर नेहमीच रिपब्लिकन पक्षाच्या गटाविषयी गरळ ओकली आहे. परंतु आता बाळासाहेबांची शिवसेना फुटली. त्यात ठाकरे गट, शिंदे गट तयार झाले. पुढे निवडणूकांनतर किती गट पडतील हे सांगताही येणार नाही. आता काल परवा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, राष्ट्रवादीतही शरद पवार गट आणि अजित दादा पवार गट तयार झाले. काँग्रेस मध्ये देखील उघड फुट न पडतात, अंतर्गत मोठ मोठे गट कार्यरत आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीला या पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला दोष देण्यात येत आहे. खरं आहे. देश व राज्यातील प्रबळ सत्ताधारी पक्ष हा नेहमीच देशातील व राज्यातील दुब...