Wednesday, January 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Shiv Sena-MNS

शिवसेना-मनसेमधुन आलेल्या उपऱ्या उमेदवारावर पुणे शहर काँग्रेसची मदार, काँग्रेसचे निष्ठावंत मेले होते काय, उपऱ्याला उमेदवारी दिली….?

शिवसेना-मनसेमधुन आलेल्या उपऱ्या उमेदवारावर पुणे शहर काँग्रेसची मदार, काँग्रेसचे निष्ठावंत मेले होते काय, उपऱ्याला उमेदवारी दिली….?

राजकीय
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/देशात सत्ता उपभोगलेल्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या स्थानिक निष्ठावंताची अवस्था शहरात उंडरणाऱ्या भटक्या पाळीव प्राण्यासारखी झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे (बीजेपी) मुळचे निष्ठावंत, काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत प्रत्येक लोकसभा, विधानसभा निवडणूकीत आज उमेदवारी मिळेल, उद्या मिळेल म्हणून पक्षाचे काम निष्ठेने करतात. परंतु मागील 20 वर्षात त्यांना उमेदवारी मिळाली नाही. सध्या देशात 2024 च्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणूका होवू घातल्या आहेत. पुणे शहरात देखील काँग्रेसचे निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु काँग्रेसने पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना व मनसे या पक्षातून काँग्रेस मध्ये आलेल्या उपऱ्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे पुणे शहर काँग्रेसमध्ये कमालिची अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपाने मात्र मोहोळांना उमेदवारी दिल्याने,...