Wednesday, January 8 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: sharadpawar

काल शिवसेना फुटली… आज राष्ट्रवादीत गट पडले, थोडक्यात… सत्ताधारी प्रबळ पक्ष लहान पक्षांना खिळखिळे करतात, फुट पाडतात हेच खरे

काल शिवसेना फुटली… आज राष्ट्रवादीत गट पडले, थोडक्यात… सत्ताधारी प्रबळ पक्ष लहान पक्षांना खिळखिळे करतात, फुट पाडतात हेच खरे

राजकीय
नॅशनल फोरम/अनिरूद्ध शालन चव्हाण…..काल पर्यंत कै. बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील गटातटांवर नेहमी भाष्य करीत असत. काय हे गट… काय हे तट… म्हणून खिल्ली उडवली जात होती. देशातवर स्वातंत्र्यानंतर 60 वर्ष सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने तर नेहमीच रिपब्लिकन पक्षाच्या गटाविषयी गरळ ओकली आहे. परंतु आता बाळासाहेबांची शिवसेना फुटली. त्यात ठाकरे गट, शिंदे गट तयार झाले. पुढे निवडणूकांनतर किती गट पडतील हे सांगताही येणार नाही. आता काल परवा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, राष्ट्रवादीतही शरद पवार गट आणि अजित दादा पवार गट तयार झाले. काँग्रेस मध्ये देखील उघड फुट न पडतात, अंतर्गत मोठ मोठे गट कार्यरत आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीला या पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला दोष देण्यात येत आहे. खरं आहे. देश व राज्यातील प्रबळ सत्ताधारी पक्ष हा नेहमीच देशातील व राज्यातील दुब...
राष्ट्रवादीत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष

राष्ट्रवादीत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष

राजकीय
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी, स्वतःला विरोधी पक्ष पदावर जबाबदारी काढुन घेवून ती जबाबदारी इतरांवर देण्याबाबत माध्यमांमध्ये भाष्य केले आहे. खरं तर विरोधी पक्ष नेतेपद सोडण्याबाबत त्यांनी हे विधान नेमकं का केलं याबाबत तर्क वितर्क होत असतांनाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद स्वतःकडे ठेवण्यासाठीच अजितदादांनी हे विधान केल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील बहुतांश मुख्य पदांवर श्रीमंत मराठा समाजाला स्थान देण्यात आले आहे. आता देखील प्रदेश अध्यक्ष पदावर अजितदादांनी हक्क सांगायला सुरूवात केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस मधील ओबीसी नेते देखील सतर्क झाले आहेत. ओबीसी नेत्यांनी देखील प्रदेशअध्यक्ष पदावर हक्क सांगत आहेत. राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या पाठोपाठ आता छगन भुजबळ यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक...
राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, ते सरड्यासारखे रंग बदलतील : बाळासाहेब आंबेडकर

राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, ते सरड्यासारखे रंग बदलतील : बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
नॅशनल फोरम/बदलापुर/दि/ प्रतिनिधी/राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, ते सरड्यासारखे रंग बदलतील असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान या देशात बदल अपेक्षित असून कर्नाटक मार्ग दाखवून देईल. तसेच 2024 मध्ये बऱ्याच घटना घडतील असंही त्यांनी बदलापुर येथील सभेत वक्तव्य केले आहे.यावेळी ते म्हणाले की, मी कित्येकवेळा सांगितले आहे की, या राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका, हे सरड्यासारखे कधी कलर बदलतील हे सांगता येणार नाही. फुले, शाहू, आंबेडकरांचे नावे हे केवळ एक कलर दाखविण्यासाठी आहे. परंतु यांचा असणारा खरा कलर आत्ता दिसायला लागला आहे. आज जातील की उद्या जातील, की परवा जातील अशी चर्चा आपणांस दिसते. 2024 च्या अगोदर बऱ्याच घटना याच्या अगोदर घडणार आहेत. कदाचित कर्नाटक हा मार्ग दाखवु शकतो. या देशाला बदल अपेक्षित आहे. फक्त बदलाचे शब्द ठरेल आणि त्याचा हुंकार हा पण झाला पाह...
अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी केसेस काढून घेण्यासाठीच : बाळासाहेब आंबेडकर

अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी केसेस काढून घेण्यासाठीच : बाळासाहेब आंबेडकर

राजकीय
नॅशनल फोरम/बदलापुर/दि/ प्रतिनिधी/स्वतःवरील केसेस काढून घेण्यासाठी अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. बदलापूरमधील एका कार्यक्रमात बाळासाहेब आंबेडकर बोलत होते. यावेही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप, आरएसएसवर जोरदार टीका केली. सोबतच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसह बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरही वंचित बहुजन आघाडीची भूमिका जाहीर केली आहे. यावेळी अजित पवारांविषयी बोलताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, अजित पवार यांचं कौतुक केलं की त्यांनी त्यांच्यावरच्या केसेस काढून घेण्यासाठी शपथविधी करुन घेतला. आपल्या केसेस विड्रॉ केल्या. केसेस काढून घेतल्यानंतर सरकारमधून बाहेर पडले आणि पुन्हा एनसीपीमध्ये गेले. राष्ट्रवादीने फसवणूक केली, सरड्यासारखा रंग बदलते -यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका के...