गुन्हे युनिट 1 च्या शब्बीर सय्यदांची जब्बर कारवाई,
समर्थ हद्दीत 47 लाखांचा दरोडा घालणाऱ्यांना केले जेरबंद
crime unite1
गाडीच्या नंबरप्लेटला चिखल फासला, तोंडावर मास्क, डोक्यावर टोपी आणि डोळ्यांना गॉगल सांगा आता तपास तरी कसा करायचा…
नॅशनल फोरम/पुणे/दि/समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील सुमा पन्ना या नाना पेठेतील सिगारेट- बडीशेपच्या डिलरशिप असलेल्या दुकानातून मालाच्या विक्रीचे पैसे बँकेत भरण्यासाठी जात असतांना, सरावलेल्या दोन गुन्हेगारांनी त्यांच्या गाडीस मागून धक्का देवून, तुला गाडी निट चालवीता येत नाही का? असे म्हणुन त्यांचा रस्ता अडवून दोघांपैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांना कोयत्याचा धाक दाखवून हाताने मारहाण करून त्यांच्याकडील रोख 47 लाख 26 हजार रुपये व एकुण 14 चेक असलेली बॅग जबरीने चोरून नेली होती. दरम्यान आरोपींनी वापरलेल्या काळ्या रंगाचे मोपेडचा नंबर आरोपींनी दोन्ही बाजुचे नंबरप्लेटवर चिखल लावल्याने नंबर प्राप्त झाला नव्हता व तोंडास मास्क, डोक्यावर टोपी, डोळ्यास गॉगल लावल्याने त्यांची ओळख पट...