कोरेगाव पार्क मधील वेश्याव्यवसायाला पोलीसांचा वरदहस्त?
सामाजिक सुरक्षा विभागाची कोरेगाव पार्क मध्ये धडक कारवाई, कलम 370 सह 3,4 व 5 अन्वये कारवाईकोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर वरीष्ठांची एवढी मर्जी कशासाठी?
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कोरेगाव पार्क सारख्या उच्चुभू्र ठिकाणी नेमकं काय चाललं आहे. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे लक्ष आहे की नाही… की या गोरख धंदयात स्थानिक पोलीसांचा वरदहस्त आहे… प्रश्न अनेक असले तरी, कोरेगाव पार्क सारख्या उच्चभू्र ठिकाणी स्थानिक पोलीसांच्या वरदहस्त खेरीज कुणीही असे धाडस करू शकणार नाहीये. कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन हद्दीत आज मसाज पार्लर व स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईवरून दिसून आले आहे.
सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने कोरेगाव पार्क परिसरातील, स्पावर छापा टाकुन 3 परदेशी व दोन भारतीय अशा एकुण पिडीत मुलींची सुटका केली आहे. सामाजिक...