बाळासाहेब आंबेडकर यांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले ‘आता मंत्रिमंडळही काँट्रॅक्टवर भरा’
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कोविड नसता तर आतापर्यंत भीमा कोरेगाव प्रकरणाची सुनावणी झाली असती. पण ही सुनावणी एका बाजूनेच सुरू आहे. माझी उलट तपासणी झाली. संभाजी महाराज यांची समाधी, त्याची तपासणी झाली. पण, जशी हवी तशी तपासणी होत नाही. योग्य रीतीने कामकाज होत नाही असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केली.
भीमा कोरेगाव प्रकरणाची सुनावणी होत आहे. परंतु आयोगाच्या हातात काहीही नाही. पुढील सुनावणी 19 ऑक्टोबरला होणार आहे. मात्र, महत्वाच्या व्यक्तींची साक्ष झाल्याशिवाय ही सुनावणी पूर्ण होणार नाही. पूर्वीच्या अनेक गोष्टी परत नव्याने काढल्या जात आहे असे ते म्हणाले.
मराठवाड्यातील दुष्काळाकडे सरकार काळजीपूर्वक बघत नाही. कल्पकता असल्याशिवाय इथला दुष्काळ संपणार नाही. पाणी वळवले तर दुष्काळ संपेल अशी येथील परिस्थिती आहे. इंडिया आघाडीवर बहिष्कार घातला. कारण, प्रत्...