बेरोजगारीचे भीषण वास्तव! पोलीस शिपाई होण्यासाठी डॉक्टर, अभियंते, वकील, एमबीए, पदव्युत्तरही रांगेत
बेरोजगारी व महागाई या विषयावर राजकीय पक्ष आणि पत्रकारांची तोंडे कोणत्या कारणाने बंद झाली आहेत तेवढं तरी सांगा,
पुणे/दि/ नॅशनल फोरम/दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या, सर्वांना उच्च शिक्षण, शिक्षण व नोकरीतील आरक्षणाला संरक्षण, महागाई कमी केली जाईल, सर्वांना स्वतःचे घर, देशातील एकही नागरीक उपाशी राहणार नाही अशा प्रकारच्या लोकप्रिय घोषणांनी प्रत्येक निवडणूका चांगल्याच गाजल्या. परंतु मागील 70 वर्षात देशाच्या मालकीच्या सर्व सरकारी कंपन्यांची विक्री केल्यामुळे सरकारी कंपन्यातील आरक्षण आपोआप संपुष्टात आले. सरकारी कार्यालयातही घटनात्मक आरक्षणाची पदे न भरता, ती पदे पीपीपी तत्वावर भरली गेल्यामुळे आपोआपच घटनात्मक आरक्षण संपुष्टात आले आहे. लहान व मध्यम स्वरूपाचे लहान उद्योगांवर सर्वच प्रकारचे कर लादल्यामुळे होते नव्हते ते सर्व उदयोग बंद पडले.याचा सर्व परिणाम असा झाला की, पुण्यासह संपूर्ण देशात बेर...